
अमरावती – शहरातील प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवी, अटाळकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे संचालक तथा भाजपा संत गाडगे बाबा मंडळ चे उपाध्यक्ष प्रकाश अटाळकर यांचे प्रतिष्ठान तर्फे दिनदर्शिका (कॅलेंडर) २०२६ चा प्रकाशन सोहळा गुरुवार, दि.१८/१२/२०२५ रोजी श्री गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने २०२६ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा भाजपा संत गाडगेबाबा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी भाजपा संत गाडगे बाबा मंडळ चे अध्यक्ष अभिजित उर्फ छोटू वानखडे, माजी नगरसेविका रिता मोकलकर, मंडळ उपाध्यक्ष श्याम पाद्य , ऋषिकेश देशमुख, महामंत्री अमोल आगरकर, महामंत्री आकाश दानखडे, प्रदीप कुलकर्णी, सचिन खंडारे, अश्विन राऊत, संजीव कटलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.





