हिंगोली – आखाडा बाळापूर येथे नुकताच महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटनेचा जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा व सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कार समारंभ राज्य अध्यक्ष नंदकिशोर हिवसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील यांना एकत्रित करून गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय अतुलनीय सेवा देणारे सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कार समारंभ संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन मोरे पाटील यांनी आयोजित केला होता.
या मेळाव्याचे उद्घाटन आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विष्णुपंत गुट्टे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटना राज्य कार्याध्यक्ष राहूल उके पाटील, राज्य महासचिव सुजय देशमुख, राज्य उपाध्यक्ष प्रेमचंद राठोड पाटील, राज्य समन्वयक अशोक गेडाम पाटील, धोंडीबा राऊत पाटील, विदर्भ अध्यक्ष प्रदिप मोहतुरे पाटील, प्रसिद्धी प्रमुख संतोष बोर्डे पाटील होते.
हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या अडी अडचणी समजून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भरीव चर्चा करून तसेच अत्यंल्प मानधनावर पोलीस पाटील पदावर असणारे आणि सेवानिवृत्त झालेले पोलीस पाटील यांचा उपस्थितीच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. सोबतच उपस्थित असलेले पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर वाशीम जिल्हाध्यक्ष मंगेश सरनाईक,अकोला जिल्हाध्यक्ष राजेद्र चानेकर पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष विजय सरदार पाटील, नांदेड जिल्हाध्यक्ष रामदास चव्हाण पाटील,नागपूर जिल्हाध्यक्ष अमोल ठाकरे पाटील, मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष मोहन सदार पाटील, नांदेड दिगाबंर कदम पाटील, हिंगोली जिल्हा सचिव डिगाबंर शिंदे पाटील, हिंगोली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाष्कर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष दिपालीताई देशमुख, तालुकाध्यक्ष हिंगोली संजय पडघने पाटील, तालुकाध्यक्ष औढा नागनाथ शंकरराव घुगे पाटील, तालुकाध्यक्ष कळमनुरी मुंकदराव होडबे पाटील, तालुका सचिव सचिन ढाकरे पाटील, तालुकाध्यक्ष सेनगाव तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव प्रा. मोहन नरवाडे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष हिंगोली यादवराव कुंभकर्ण पाटील प्रमुख उपस्थित होते.
सुत्र संचालन गोरख पानपट्टे
प्रास्ताविक गजानन मोरे पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रविण देशमुख यांनी केले.
राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या बाबत यशस्वी पाठपुरावा सुरू असून हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील पदभरती हि सुध्दा संघटनेच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे सुरू झाली असून मागण्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य अध्यक्ष नंदकिशोर हिवसे पाटील यांनी मेळाव्यात बोलतांना केले.





