कल्याण डोंबिवलीत एका उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपकडून पैशांचे वाटप, शिदें गटाने उधळला डाव

SHARE:

ठाणे – महापालिका निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आला पोहोचला असताना भाजपने सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका उमेदवाराच्या प्रचारार्थ चक्क पैशांचे वाटप केल्याचं उघडकीस आलं आहे. मात्र शिंदे गटाने भाजपचा हा डाव उधळून लावला आहे. त्यामुळे, महायुती म्हणून एकत्र लढणाऱ्या भाजप आणि शिवसेनेतच येथे आणखी जुंपल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान पांढऱ्या पाकिटात ३००० रुपये म्हणजे ५०० रुपयांच्या ६ नोटा टाकून हे पैसे वाटप केले जात होते. डोंबिवलीतील एका महिलेच्या घरी पैशांची पाकिटे आढळल्यानंतर हा प्रकार समोर आला. डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन भागात भाजपकडून तीन हजार रुपयांची पाकीटे नागरिकांच्या घरी पोहोचवण्यात आली.

हा पैसे वाटप विशू पेडणेकर यांचे कार्यकर्ते करत असल्याचं समोर आलं आहे, विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व्हिडिओ बनवून हा पैसे वाटपाचा डाव उधळत असल्याचंही दिसून येतं. यानंतर येथील शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहाथ हात पकडल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे पथक व पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

येथील प्रभागात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होत असून भाजप उमेदवाराविरुद्ध शिवसेना उमेदवार येथे निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामुळे, येथे महायुतीतील दोन पक्षांतच थेट लढत होत असल्याने मोठी रस्सीखेंच पाहायला मिळते. पैसे वाटण्याचा डाव उधळल्यानंतर महायुती म्हणून एकत्र लढणाऱ्या भाजप आणि शिंदेसेनेत येथे आणखी वादावादी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

माहित असावे कि कोणतीही निवडणूक म्हटली कि साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा वापर अवश्य केला जातो. इतकेच नाही तर निवडणुकीदरमयान मतदारांना अनेक आमीशं दाखवून त्यांची मतं आपल्या पदरात राजकीय पक्ष पाडून घेतात. मात्र आचार संहिता असतानाही अशा घटना होणे, हे निवडणूकांचे उल्लंघन आणि लोकशाहीवर कलंक आहे.

Leave a Comment

अधिक वाचा