कोल्हापूर महापालिकेत मोठा पक्ष काँग्रेस ठरला, तरीही स्पष्ट बहुमत नाही

SHARE:

कोल्हापुर – कोल्हापूर महापालिकेत मोठा पक्ष काँग्रेस ठरला आहे, तरीही कोल्हापुरात काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही. कोल्हापुर महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी, विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी पुरेपूर प्रचारांच्या साधनांचा वापर केला आहे.

कोल्हापूर महापालिकेची ही निवडणूक, कमालीची संघर्षमय ठरली आहे. कोल्हापुरमधील मंत्री, आमदार, खासदारांसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. या कोल्हापुर महापालिका निवडणुकीचा निकाल झाला आहे. पहिल्या टप्प्यात निकाल आल्यावर, तासाभरात सत्तासमीकरणाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कोल्हापुर शहरात आठ वर्षांनंतर झालेल्या, कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा, निकाल जाहीर झाला. कोल्हापुरमधील २० प्रभागांतील सर्व जागांचे चित्र स्पष्ट झाले. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत, सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला आहे. परंतु कोल्हापुर महापालिका निवडणुकीत ला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. कोल्हापुर महापालिकेत भाजपला २५ जागा, तर शिवसेना शिंदे गटाला १५, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४ असे मिळून महायुती एकूण ४४ जागा, तर विनय कोरे यांचा असलेला पक्ष जनसुराज्यला एक जागा मिळाली आहे.

काँग्रेसचे सतेज पाटील यांनी कोल्हापुरात 35 जागांवर विजय मिळवला आहे. तर तर ठाकरे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. कोल्हापुर शहरात सत्ताधारी व विरोधकांमध्ये लढत संघर्षमय पाहायला मिळाली आहे. शहरांतील काही प्रभागांमध्ये अत्यल्प मताधिक्याने निकाल लागला आहे, तर काही ठिकाणी एकतर्फी विजय झाला आहे.

या निवडणूकीत महिला उमेदवारांचा सहभाग जास्त होता. कोल्हापूर शहरातील अनेक प्रभागांमध्ये, महिलांनी विजय मिळवला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष करण्यात आला. मात्र काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोल्हापुरमधील २० प्रभागातून एकूण ८१ सदस्य निवडून आले. महापालिका निवडणूक प्रक्रियेत, प्रचारात आरोप-प्रत्यारोप झाल्यामूळे काही ठिकाणी वाद झाले आहेत, तर काही ठिकणी शांतता पाहायला मिळाली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा