अरुणाचल प्रदेशात केरळमधील पर्यटकांचा अपघात, तवांग लेक परिसरात २ तरुणांचा मृत्यू

SHARE:

अरुणाचल प्रदेश – अरुणाचल प्रदेशात केरळमधील पर्यटकांचा अपघात झाला आहे, या तवांग लेक परिसरातील अपघातात २ तरुणांचा मृत्यू झाला आहे. केरळच्या पर्यटकांचा अरुणाचलमध्ये मृत्यू झाला आहे, तर गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू झाला आहे, आणि एकाचा शोध सुरु आहे.

अरुणाचल प्रदेशात थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या, केरळमधील पर्यटकांच्या सहलीतील २ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अरूणाचल प्रदेशातील तवांग परिसरात घडलेल्या अपघातात, दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर एका मृतदेहाचा शोध अजूनही सुरूच आहे. या घटनेमुळे अरूणाचल प्रदेशात खळबळ माजली आहे.

केरळमधून ७ तरुणांचा एक गट ,अरुणाचल प्रदेशातील तवांग शहरात पर्यटनासाठी गेला होता. शुक्रवारी हे सर्वजण सुमारे १३ हजार फूट, उंचीवर असलेल्या प्रसिद्ध सेल लेक परिसरात गेले. या भागात प्रचंड थंडीमुळे तलावाचे पाणी पूर्णपणे गोठले होते. बर्फावरून चालण्याचा मोह काही पर्यटकांना आवरता आला नाही.

चालताना एका तरुणाचा पाय घसरला आणि तो थेट बर्फाखालील थंड पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दिनू आणि महादेव या दोघांनी कोणताही विचार न करता पाण्यात उडी घेतली. पाय घसरलेला तरुण सुदैवाने बाहेर काढण्यात यश आले, मात्र दिनू आणि महादेव हे दोघेही बर्फाळ पाण्यात अडकले. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेक तास प्रयत्न करूनही रात्री उशिरापर्यंत, एकाच तरुणाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्याचा शोध अद्याप सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर तवांग जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पर्यटकांना, सावधगिरीचा इशारा दिला आहे. डिसेंबर २०२५ च्या महिन्यानंतर गोठलेल्या तलावांजवळ, जाणे आणि बर्फावर चालणे धोकादायक आहे, तसे धोकादायक असल्याबाबत, नियमावली जाहीर करण्यात आली होती. वरून मजबूत वाटणारा बर्फाचा थर प्रत्यक्षात, वजन सहन करू शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते.

या परिसरात सूचना फलक असूनही, पर्यटकांचे इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यानेच, हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अरूणाचल प्रदेशात पर्यटकांना सावध करण्यासाठी परिसरात, ठिकठिकाणी सुचना फलकही लावण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने, ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. अरूणाचल प्रदेशातील तवांगमध्ये अत्यंत थंड तापमान आणि बर्फामुळे शोधमोहीमेत, अडथळे येत असल्याची माहिती अरूणाचल प्रदेश प्रशासनाने दिली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा