अलिबाग – रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अलिबागमधू्न १५० अर्ज दाखल झाले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद ७ जागांसाठी ५५ , पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ९५ उमेदवार आहेत. रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या, अंतिम दिवसापर्यंत अलिबाग तालुक्यातून, जिल्हा परिषदेच्या 7 जागांसाठी ५५, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ९५ अर्ज असे एकुण १५० अर्ज दाखल झाले आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या 59 आणि जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास, १६ जानेवारी २०२६ पासून सुरुवात झाली आहे. मात्र,१८ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल झाले नाही. होता. उमेदवारांनी १८ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करताना, प्रतिस्पर्धी पक्ष कोणता उमेदवार देतो याची चाचपणी सुरू ठेवली, तसेच युती-आघाड्यांची गणिते जुळतात का, याचाही अंदाज बांधला जात होता.
त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार, जाहीर करण्यात उशीर झाला आहे. युती, आघाडीचे प्रयत्नही केले जात होते. बंडखोरी टाळण्यासाठीदेखील राजकीय पक्षांनी, उमेदवारी जाहीर करण्यात उशीर केला आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज ,भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. काही उमेदवारांनी अगदी शेवटची, १५ मिनिटे शिल्लक असताना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अनेक उमेदवारांची अडचण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता होती. राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी ,उशिरा उमेदवारी जाहीर करण्याचा नियोजन केले होते. शेवटपर्यंत राजकीय पक्षांत, बंडखोरी होऊ नये प्रयत्न सुरू होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची, मुदत बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. उमेदवारी जाहीर होत नसल्याने, उमेदवार आणि त्यांचे समर्थकांमध्ये भीती होती. रायगड जिल्ह्यात यावेळी युती विरुद्ध आघाडी, असे चित्र सध्यातरी दिसत आहे; परंतु काही ठिकाणी विचित्र आघाड्या पाहायला, मिळण्याची शक्यता आहे. भाजप काही ठिकाणी शिवसेनेबरोबर, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवारी ,अर्ज दाखल करून ठेवले आहेत. युती-आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्ज मार्ग घेण्याची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 आहे.





