चंद्रपुर – काँग्रेस नेते वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या नगरसेवकांत हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आला आहे. काल चंद्रपुरामध्ये काँग्रेस नगरसेवकांच्या पळवापळवीचा प्रकार समोर आला आहे. समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार काल घडला आहे. या प्रकरणात काँग्रेस नेत्या धानोरकर यांच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ ठोंबरे यांच्या कबुलीमुळे काँग्रेस नेते वडेट्टीवार आणि काँग्रेस नेत्या धानोरकर यांच्यात नगरसेवकांच्या सुरु असलेल्या पळवापळवीत काल रस्त्यावर हाणामारी झाली आहे.
चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी पळवलेल्या आमच्या ३ नगरसेवकांसोबत खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बोलणे करून देण्यासाठी आम्ही गाडी थांबवली होती. अशी प्रतिक्रिया सौरभ ठोंबरे यांनी दिली आहे. सौरभ ठोंबरे यांनी विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणात मुख्य आरोपी सौरभ ठोंबरे आहे. सौरभ ठोंबरे यांच्या कबुलीमुळे वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात नगरसेवकांची सुरु असलेली पळवापळवीचा प्रकार समोर आला आहे. धानोरकर गटाचे 5 नगरसेवक वडेट्टीवारांकडे गेले आहेत.
पुण्यावरून नागपूरकडे येत असलेल्या विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. असा आरोप वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी केला आहे. शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी देणार्यांमध्ये पराभूत काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह १० ते १५ जणांचा समावेश आहे. यामध्ये पोलिसांनी आरोपीं पैकी एकाला अटक केली आहे. सौरभ ठोंबरेसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडुर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया झाल्यानंतर वडेट्टीवार गटाचे सर्व नगरसेवक नागपूरकडे गेल्याची माहिती आहे. राज्यातील चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस नेत्या खासदार प्रतिभा धानोरकर, या दोन्ही नेत्यांमध्ये आपाआपसांतील वाद वाढल्याचे चित्र दिसत आहे. या कारणामूळे दोन्ही गटातील वाद वाढून हाणामारी झाली आहे.





