महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सदस्यसंख्या वाढवल्याने, सर्वोच्च न्यायालयाने आमदार रोहित पवारांना फटकारले

SHARE:

मुंबई – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सदस्यसंख्या वाढवल्याने, सर्वोच्च न्यायालयाने आमदार रोहित पवारांना फटकारले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सत्ता टिकवण्यासाठी मनमानी पद्धतीने संघटनेची सदस्यसंख्या वाढवल्यामूळे सर्वोच्च न्यायालयाने रोहित पवार यांना फटकारले आहे.

बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते, असे रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रकरणी रोहित पवारांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. रोहित पवारांनी सुप्रीम कोर्टातून याचिका मागे घेतली आहे.

बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना विचारला आहे.

रोहित पवारांनी पवार कुटुंबातील सदस्यांसह ४०० आजीवन सदस्य नोंदवले होते. त्याविरोधात टीम इंडियाचा माजी क्रिकेटर केदार जाधव यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरुन सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना फटकारले आहे. बेकायदेशीर कामे करता, केस मागे घेता की डिसमिस करु?’ अशी विचारणा कोर्टाने केली आहे. तर सदस्य नोंदणीवर कोर्टाने विरोध केला आहे.

बीसीसीआय प्रकरणी निकाल दिल्यानंतर सदस्य नोंदणीला सुप्रीम कोर्टाची परवानगी लागते. आधी एमसीएच्या संविधानात तसा बदल करावा लागतो, याची माहिती असूनही बेकायदेशीर काम केल्याचा आरोप रोहित पवारांवर आहे. याच प्रकरणात सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना अनेक प्रश्न विचारले आहे. केदार जाधव यांच्या याचिकोनंतर हायकोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्याविरोधात रोहित पवार सुप्रीम कोर्टात गेले होते. यावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. इतकी बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या इशार्यानंतर रोहित पवारांनी याचिका मागे घेतली आहे.

रोहित पवारांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सत्ता टिकवण्यासाठी, मनमानी पद्धतीने संघटनेची सदस्यसंख्या वाढवल्याचा आरोप भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवने केला होता. केदार जाधव हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आहे. रोहित पवारांनी आपल्या बाजूने मतदान व्हावे यासाठी एमसीएची सदस्यसंख्या १५४ वरुन वाढवून ५७१ केली आहे. त्यासाठी रोहित पवारांनी सदस्य करून घेतलेल्यांमधे त्यांची पत्नी कुंती, सासरे सतिश मगर यांच्यासह सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सदानंद सुळे यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर रोहित पवारांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, सदस्य करून घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक राजकीय नेते आणि शैक्षणिक संस्थांना देखील निवडणुकीच्या तोंडावर सदस्य करून घेण्यात आले आहे. असा आरोप केदार जाधव यांनी आमदार रोहित पवारांवर केला होता.

रोहित पवारांच्या या कारभाराच्या विरोधात केदार जाधवसह लातुर जिल्हा क्रिकेट असोसिएशन , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अनंत माटे, पुण्यातील एस पी महाविद्यालय यांनी या निर्णयाला विरोध करत स्वतंत्रपणे या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावरती निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय दिला होता. या प्रकरणाची सुनावणी ४  फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत एमसीएच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. यानंतर रोहित पवार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Leave a Comment

अधिक वाचा