अजित पवार गेले आता सिंचन घोटाळ्यातील इतर आरोपींचे काय? तर न्यायालयावरील आमचा विश्वास उडाला आहे; राज्याचे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे

SHARE:

मुंबई – अजित पवार गेले आता सिंचन घोटाळ्यातील इतर आरोपींचे काय? तर न्यायालयावरील आमचा विश्वास उडाला आहे, असे राज्याचे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी म्हटले आहे. सोबतच भाजपा सरकारवर ही टीका केली आहे. राज्याचे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी म्हटले आहे की, देशातील न्यायालयावर तर विश्वास उडाला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांचा अपघात हा दुर्दैवी आहे. अजित पवार गेल्यानंतर आता सिंचन घोटाळ्याबाबत न्यायालयावरील विश्वास उडाला आहे. अपघाताची चौकशी करणार्या डीजीसीएचा अहवाल काय येईल, यावर तात्कालीन सिंचन विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी शंका उपस्थित केली आहे.

विजय पांढरे यांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळा प्रकरणी काही धक्कादायक आरोप केले होते. अजित पवारांबाबत जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेवर अनेकांनी शंकाही उपस्थित केल्या आहेत, तर राज्यात शंका येईल अशा काही घटनाही घडलेल्या आहेत. अजित पवारांनी भाजपाच्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे असे म्हटले आणि त्यानंतर हा अपघात घडला आहे. त्यामुळे अनेकांना यात शंका वाटते. अशा अपघातांची सरकार चौकशी करेल. त्या चौकशीचा अहवाल मात्र भाजपा सरकार आपल्या मर्जीप्रमाणे तयार करेल अशी शंका मला आहे. सत्य लपवून ठेवले जातात असा, माझा अनुभव आहे, असे विजय पांढरे यांनी म्हटले आहे.

सरकारी चौकशी अहवाल हे कोणत्याही सरकार धार्जीने असतात. मी अजित पवारांवर आरोप केले ते व्यक्तिशः किंवा द्वेषातून केले नाही. राज्यातील जनतेचा पैसा हा मोकाट खर्च होत होता म्हणून, मी सरकारी यंत्रणेवर आरोप केले होते. यानंतर मी राज्यातील सर्व महामार्गांचे इस्टिमेट बोलावून त्याचे पोस्टमार्टम करणार आहे. कारण राज्यातील महामार्गावर होणाऱ्या खर्चातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. अजित पवार गेले, आता राज्यातील सिंचन घोटाळ्यातील इतर आरोपींचे काय होणार? यात सांगायचे झाले तर, न्यायालयावरील आमचा विश्वास उडालेला आहे, असे विजय पांढरे म्हणाले आहेत.

राज्यात भाजपा सरकारची परिस्थिती आज इतकी वाईट आहे की, सर्वोच्च न्यायालयाने लाडक्या बहीण सारख्या योजनांवर बंदी आणायला पाहिजे. देशात जे वकील घोटाळ्यांच्या पीआयएल न्यायालयात टाकतात त्याच, वकिलांना सरकार उच्च न्यायालयात न्यायाधीश बनवतात. काँग्रेसच्या काळात जे सिंचन प्रकल्प मंजूर झाले आहेत, ते प्रकल्प सध्याचे भाजपा सरकार पूर्ण करू शकत नाही. कारण या प्रकल्पांसाठी लागणारा पैसा भाजपा सरकारकडून लाडकी बहीण सारख्या योजनांकडे वळवण्यात आला आहे. वैनगंगा-नळगंगा प्रकल्प हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बोगस प्रकल्प आहे. गेल्या ४० वर्षापासून राज्यात २०० प्रकल्प आपल्याकडे अपूर्ण असताना, राज्यातील भाजपा सरकार नवीन प्रकल्प घोषित का करत आह?े हेच कळत नाही. हातातले प्रकल्प पूर्ण केले नाहीत आणि नवीन प्रकल्प आणायचे हा राज्यातील भाजपा सरकारचा मूर्ख आणि दिवाळखोरपणा आहे अशी टीका राज्याचे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा