औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी सुरु असल्याचा प्रकार उघड; पालघर मधे पोलिसांची मोठी कार्यवाही

SHARE:

पालघर – जिल्ह्यामध्ये औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार महामार्गावर चालत असल्याचे उघड झाले आहे. पालघर जिल्ह्यामध्ये औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी खूलेआम सूरू आहे, व याप्रकरणात मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी सुरु असल्याचा हा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणात पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या पालघर पोलिसांच्या कारवाईत २६.२८ लाखांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत तलासरी पोलिसांनी बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई केली आहे. या कडक कारवाईत २६ लाख २८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे.

आजही पालघर जिल्ह्यामध्ये औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी रोज सुरू आहे. पालघरमधील महामार्गावरुन मुंबईकडे जाणाऱ्या टाटा टेम्पोमधून औषधांच्या नावाखाली महाराष्ट्रात बंदी असलेल्या असलेल्या दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. हिमाचल-पंजाब ढाबा परिसरात टेम्पोची तपासणी केली असता, ९  लाख २८ हजार ३२० रुपयांची दारू सापडली आली. त्या दारू तस्करी करणार्या वाहनासह एकूण 26.28 लाख रुपयांचा मुद्देमाल पालघर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात वाहन चालक शिवेंद्रकुमार ठाकुर याला अटक करण्यात आली आहे. तसेच तलासरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अधिक तपास तलासरी पोलीस करत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा