सातारा – जिल्ह्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटांच्या नेत्यांची बैठक होत आहे. सातार्यामध्ये भाजपाला वगळून इतर राजकीय पक्षांची सत्ता स्थापनेसाठी हालचाली सूरू आहे. शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकी होत आहेत. साताऱ्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक बैठक झाली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निकालानंतर आता सातार्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीव राजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांची सातार्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये २७ जागा भाजपाला मिळाल्या आहे. राष्ट्रवादीला २० तर शिंदेंगट शिवसेनेने १५ जागा जिंकल्या आहेत. सातार्यामध्ये बहुमतासाठी ३३ जागांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तर बहुमताचा आकडा गाठणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये हालचाली सुरू आहेत. साताऱा जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची, खासदारांची एक बैठक पार पडली आहे.
या बैठकीत शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीव राजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण हे उपस्थित राहिले होते. सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी ही बैठक आयोजित केली होती, त्यावर प्राथमिक चर्चा झाली आहे, असे मंत्री मकरंद पाटील व शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. आता सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नवीन घडामोडी होत आहेत. तर सत्ताधारी भाजपाला सातारा जिल्हा परिषदेत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, जिल्ह्यातील राष्ट्रवादी व शिवसेनेतील राजकीय नेत्यांच्या सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली वेगाने सूरू झाल्या आहेत.





