मुंबईमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, त्यामूळे ६०० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

SHARE:

मुंबई – एका संस्थाचालकाने अचानक इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामूळे ६०० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येणार आहे. मुंबई मधील जोगेश्वरी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल बंद करण्याच्या निर्णय झाला आहे. त्यामूळे मूलांच्या पालकांनी काळजी बाळगून मनसे नेत्यांशी संपर्क साधला आहे. याप्रकरणात मनसे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला शाळांमध्ये सुरुवात झाली आहे. मुंबईतील जोगेश्वरीमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेने विद्यार्थ्यांना दाखले घेऊन जाण्याचे सांगितल्याने, पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबई शहरातील जोगश्वरी पश्चिम परिसरात सिटी इंटरनॅशनल शाळा अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा प्रशासनाकडून शाळा बंद करण्यासाठी शाळेत शिकणाऱ्या 600 विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांचे पालकांमध्ये मुलांच्या भविष्याच्या काळजीने भीतीच्या वातावरण पसरले आहे. तर, याप्रकरणात मनसेने याची दखल घेत शाळेत धाव घेतली आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल शाळा बंद करण्याच्या निर्णय झाला आहे, त्यामूळे मूलांचे पालक चिंतेत आहेत.

मुंबई शहरातील मनसेचे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष यांच्याकडून शाळा बंद होऊ देणार नाही, असा इशारा शाळा प्रशासनाला देण्यात आला आहे. ओशिवरा परिसरातील ही शाळा, सिटी इंटरनॅशनल स्कूल नावाने मागील २५ वर्षापासून सुरू आहे, येथील शाळेत ६०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळा भाडे तत्त्वावर असल्यामुळे जागा मालकाकडून महिन्याचे भाडे ३५ लाख रुपयांच्या जागेवर आता ५० लाख रुपये भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, या भाडेवाढीला विरोध करत शाळा प्रशासनाने चक्क शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जोगेश्वरी येथील इंग्रजी शाळेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. जोगेश्वरी येथील इंग्रजी शाळा प्रशासनाला हे भाडे परवडत नसल्यामुळे शाळा प्रशासनाने शाळा बंद करण्याचे निर्णय घेतला आहे. मात्र, अचानक इंग्रजी शाळा बंद करण्याचे निर्णय घेतल्यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा बंद करण्याची माहिती मिळताच मनसेकडून शाळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. शाळा प्रशासनाकडून जर शाळा बंद करण्याची भूमिका ठाम राहिली आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वार्षिक नुकसान झाले तर, शाळेविरोधात मनसे तीव्र आंदोलन करणार आहे , असा इशारा देण्यात आला आहे.

जोगेश्वरीमधील मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष यांच्या शिष्टमंडळाकडून शाळा व्यवस्थापकांसोबत भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. याप्रकरणात मनसे आक्रमक झाली आहे. मुंबईमध्ये मागील २५ वर्षापासून सिटी इंटरनॅशनल स्कूल जोगश्वरी पश्चिम ओशिवरा परिसरात सुरू आहे. शाळा प्रशासनाचा या अचानक बंद करण्याचा निर्णयाच्या विरोधात शाळेतील मूलांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात राज्यातील शिक्षण विभागाने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी शाळेतील मूलांच्या पालकांकडून करण्यात आली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा

आजचे राशिभविष्य २३ एप्रिल २०२६: कुठल्या संकटांची आणि सुखाच्या दिवशी मध्ये आपल्याला काही समस्या अनुभवायच्या असतील की सुखाचे दिवस दिसणार? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी गुरूवार कसा जाणार? राशिभविष्य पूर्णपणे वाचा.