संभाजीनगर – जिल्ह्यात पोहायला गेलेल्या ३ अल्पवयीन मूलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. तलावाच्या काठावर तिघांचे कपडे गावातील नागरिकाला दिसले, त्यामूळे ही घटना उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावांचा व आणि एका अल्पवयीन मूलाचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संभाजीनगर जिल्ह्यात नानेगाव परिसरात शाळेला सुटी असल्याने पोहायला गेलेल्या ३ अल्पवयीन मूलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची ही घटना उघडकीस आली आहे.
संभाजीनगर तालुक्यातील नानेगाव-जंजाळा रस्त्यावरील गट क्र. १५४ मधील एका तलावात बुडून शाळेतील ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी ही घटना समोर आली आहे. ९ तासांच्या प्रयत्नानंतर स्थानिक नागरिक व गावकऱी लोकांच्या मदतीने तिन्ही अल्पवयीन मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत २ सख्ख्या भावांचा व आणखी एक मूलाचा मृत्यू झाला आहे.
यात उमर अनवर बेमरोट वय १०, साद अनवर बेमरोट वय ७ हे सख्खे भाऊ आणि सरफराज सलीम देहेंगल वय ९ तिघे रा. नानेगाव अशी मृत मुलांची नावे आहेत. सरफराज देहेंगल हा गावातील जिल्हा परिषद शाळेत तिसरीत शिकत होता, तर उमर बेमरोट चौथीचा विद्यार्थी होता. साद बेमरोट हा पांगरी येथील खासगी इंग्रजी शाळेत पहिलीमध्ये शिक्षण घेत होता. सोमवारी दुपारी ग्रामपंचायतीचा एक कर्मचारी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तलावावर मोटारपंप सुरू करण्यासाठी गेला होता.
त्याच्या नजरेस तलावाच्या काठावर मुलांचे कपडे दिसले. त्याने ही माहिती गावातील लोकांना दिली. ही घटना समजताच पालक आणि ग्रामस्थ धावतच तलावाकडे पोहोचले. काही गावकऱी आणि आणि पोहणार्या लोकांनी तलावात मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर सोमवारी सायंकाळी 3 अल्पवयीन मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सोमवारी रात्री गावातील कब्रस्तानमध्ये ३ अल्पवयीन मूलांवर दफनविधी करण्यात आला आहे. सोमवारी शाळेला सुटी असल्याने हे अल्पवयीन मूले हे तलावावर आंघोळ करण्यासाठी गेले होते. तलावात आंघोळ करताना ३ अल्पवयीन मूले नकळत पाण्यात बुडाले आहेत. बराच वेळ झाला तरी मुले घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी शोध सुरू केला होता. ग्रामपंचायतीचा कर्मचारी पाणीपुरवठ्यासाठी मोटारपंप सुरू करण्यासाठी तलावावर गेला असता त्याला ही दुर्घटना समजली आहे.





