गॅस सिलिंडरच्या काळाबाजारा विरोधात कार्यवाही, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; पुरवठा विभागाची मोठी कार्यवाही

SHARE:

नाशिक – जिल्ह्यात गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ७  जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराविरोधात पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. तर २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात ७  जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार,नाशिक शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे जिल्हा पुरवठा पथकाने सातपूर रोडवरील नाईस संकुल परिसरात धाड टाकली आहे. ही कारवाई रात्री केली आहे. या कारवाईमध्ये एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर सिलिंडरची वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले आले. तपासणीत १५८ भरलेले आणि 289 रिकामे असे एकूण ४४७ सिलिंडर जप्त केले आहेत. याशिवाय दोन छोटे टेम्पो आणि एक मोठा ट्रकही ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची किंमत २५ लाख रुपये इतकी आहे. देशातील गॅस टंचाईचा फायदा घेत नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा काळाबाजार केल्याची घटना घडली आहे.

नाशिकमध्ये हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक शहरातील सातपूर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तूंच्या काळाबाजारा संदर्भातील कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सातपूर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. संबंधित एजन्सी चालकाने काळाबाजार करत नसून सिलिंडर गोडाऊनमध्ये नेण्यासाठी वाहतूक करत असल्याचे सांगितले आहे. मात्र, पुरवठा विभाग आणि पोलीस पडताळणी करत आहे. या प्रकरणामागे आणखी कोणाचा राजकीय सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचे रेशनिंग आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गॅस वितरक आणि हॉटेल्सची तपासणी मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांना बुकिंगनंतर २  ते ३  दिवसांत सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी एजन्सींवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गॅस वापराबाबत नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. घरगुती सिलिंडरला प्राधान्य देण्यात आले आहे.

तर व्यावसायिक वापरावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील १३५ गॅस वितरकांची चौकशी सुरू आहे. पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यात १२ ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक मोठ्या हॉटेल्समध्येही अचानक चौकशी सुरू असल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा

नागपुरात एका NGO मध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत!