सातारा – जन्मलेल्या बाळाला उपाशी ठेवून सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मारून टाकल्याचा एका बाळाच्या आईकडून सातारा जिल्हा रूग्णालयावर आरोप करण्यात आला आहे. जन्मलेल्या बाळाला दूध पाजण्यासाठी विनवणी करूनही रुग्णालयाने त्याला दूध पाजू दिले नाही, रुग्णालयाने निर्दयीपणाने त्याला मारून टाकले, असा धक्कादायक आरोप एका मृत बाळाच्या आईने सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनावर केला आहे.
यासंदर्भात बाळाच्या आईकडून कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे यासदंर्भात आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असून असे काही घडले नसल्याचे सातारा जिल्हा रुग्णालयाने म्हटले आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात मृत बाळाची आई आणि कुटुंबियांनी याचिका दाखल केली आहे. जन्मलेल्या बाळाला दूध पाजण्यासाठी विनवणी करूनही सातारा जिल्हा रुग्णालयाने त्याला दूध पाजू दिले नाही, सातारा जिल्हा रुग्णालयाने निर्दयीपणाने त्याला मारून टाकले, असा धक्कादायक आरोप मृत बाळाच्या आईने सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनावर केला आहे.
हायकोर्टाचा आदेश असल्याने तुम्ही बाळाला दूध पाजू शकत नाही, असे सातारा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आहे, असे मृत बाळाच्या आईने म्हटले आहे. मी त्यांना बाळाला दूध पाजण्यासाठी सांगत होते, विनवणी करीत होते, मात्र सातारा जिल्हा सरकारी रुग्णालय माझ्याशी आणि बाळाशी अत्यंत निर्दयीपणाने वागले आहेत. २४ तास उपाशी ठेवून जीवंत जन्मलेल्या बाळाची उपासमार करीत त्याला सातारा जिल्हा रूग्णालय प्रशासनाने मारले आहे, असा आरोप मृत बाळाच्या आईने केला आहे.
संबंधित डॉक्टर आणि सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासन यंत्रणेवर गुन्हा दाखल करून मृत बाळाच्या आईला मानसिक धक्का बसल्याने 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खंडपीठातील याचिकेतून करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सातारा जिल्हा प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करून न्यायालयात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाची पुढची सुनावणी २५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर होणार आहे. महिलेच्या गर्भपातासंदर्भात आम्हाला न्यायालयाने निर्देश दिले होते. महिलेची काळजी घेऊन आम्ही त्यांच्यावर उपचार केले. महिला सुस्थितीत असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. परंतु त्यांनी गैरसमजातून तक्रार केली आहे, असे सातारा जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक युवराज करपे म्हणाले आहेत





