नाशिक – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातसोबत व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यावर रोहणी खडसेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.
या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला. म्हणून राजकारणात जास्त हवेत उडायचे नसते आता सगळा अहंकार धुळीस मिळेल, व आणखी काही राजकीय गोष्टी बाहेर पडतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिला आहे.
तसेच ज्या शिडीने वर गेले त्याच शिडीने खाली आले आहेत, शेवटी कर्म असे रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट लिहिली आहे त्यात त्या म्हणाल्या आहेत की, गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळाले असेल.
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून त्या म्हणाल्या आहेत की, माझी राज्य सरकारला मागणी आहे की, त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन थांबु नये. तर नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात, जे राजकीय व इतर लोक सामील आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी याची खबरदारी घेण्याची गरज आहे, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
ज्या गोष्टी नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात समोर येत आहेत, त्या अत्यंत भयानक व गंभीर आहेत. या प्रकरणात आणखी काही राजकीय गोष्टी बाहेर पडतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिला आहे.





