रुपाली चाकणकर यांच्या कथनी आणि करणीत फरक, तर मुलींच्या हातात पोथ्या-पुराणे नको, संविधान द्या म्हणायचे आणि वास्तवात कोणाचे तरी पाय धुवायचे; ठाकरे गट शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची टीका

SHARE:

पुणे – रुपाली चाकणकर यांच्या कथनी आणि करणीत फरक आहे, तर मुलींच्या हातात पोथ्या-पुराणे नको, संविधान द्या म्हणायचे आणि वास्तवात कोणाचे तरी पाय धुवायचे, असे ठाकरे गट शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. रुपाली चाकणकर यांनी आतातरी झोपेतून जागे व्हावे, शुद्धीवर यावे. त्यांनी सत्तेचा सगळा अहंकार सोडला पाहिजे. आता तुम्ही जमिनीवर आला आहात, भविष्यात अजून जमिनीवर येणार आहात, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. त्यांना महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात सहआरोपी करुन अटक केली पाहिजे. रुपाली चाकणकर या भोंदूबाबा अशोक खरातकडून चालवल्या जाणाऱ्या संघटित गुन्हेगारीचा भाग होत्या. त्यांच्यावर मकोका लावला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर माझी बदनामी करणाऱ्यांना मी कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले होते.

यावर बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, रुपाली चाकणकर अजूनही सत्तेच्या अहंकारात आहेत. मी चुकीच्या तारखा सांगून फोटो दाखवल्याचे रूपाली चाकणकर म्हणतात. त्यांनी आता त्यांची एकही पोस्ट डिलीट करु नये. माझ्याकडे जे फोटो आणि तारखा आल्या ते मी दाखवले. मी रुपाली चाकणकरांचा हाताचे बोट कापलेला १२ आणि ९ सप्टेंबरचा फोटो असल्याचे म्हटले होते. त्याच्या काही दिवस आधी सोमवती अमावस्या होती, एवढेच मी म्हटले होते. पण रुपाली चाकणकर सध्या दुःखी असल्याने हैराण झाल्या आहेत.

त्यांनी आतापर्यंत ५०० ते ६०० कोटींची संपत्ती कमावली आहे. सुनील तटकरे यांच्यासारख्याचा त्यांना आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांचा अहंकार इतक्यात जाणार नाही, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांच्या कथनी आणि करणीत फरक आहे. एकीकडे जाहीर कार्यक्रमात मुलींच्या हातात पोथ्या-पुराणे नको, संविधान द्या म्हणायचं आणि वास्तवात कोणाचेतरी पाय धुवायचे. ही वस्तुस्थिती आहे.

हे सगळे समोर आल्यामुळे रुपाली चाकणकर सध्या दुखावल्या गेल्या आहेत. त्यांना वाटत होते की, अख्खा राष्ट्रवादी पक्ष सुनिल तटकरे चालवतात. सुनील तटकरेंचा हात डोक्यावर आहे तोपर्यंत आपल्या केसाला धक्का लागू शकत नाही. पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे, असे ठाकरे गट शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा