कर्नाटक राज्यात ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावावर एका महिलेची ११ लाखांची फसवणुक; देशात सायबर गुन्ह्यातील प्रकरणात वाढ़

SHARE:

कर्नाटक – राज्यात ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावावर एका महिलेची ११ लाखांची फसवणुक करण्यात आली आहे. देशात सायबर फ्रॉडची प्रकरणे ही खुप वाढत आहेत. तर फसवणूक करणारे नवनवीन पद्धती तुम्हाला फसवण्यासाठी शोधत असतात. कर्नाटकात यूट्यूबवर ट्रेडिंग शिकणाऱ्या एका महिलेची मोठी फसवणूक झाली आहे. देशभरात सायबर फ्रॉडची असंख्य प्रकरणे सध्या समोर येत आहेत. कारण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे.

मोबाईल बँकिंगचे प्रमाणही वाढते आहे. देशात सायबर फसवणूक करणारे याचा फायदा घेत आहेत. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावावर एक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. कर्नाटक राज्यातील उडुपी येथे ५१  वर्षांच्या एका शिक्षिकेने सायबर फ्रॉडच्या जाळ्यात अडकून या महिलेला ११.७५ लाखांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाची सुरुवात ही यूट्यूब व्हिडिओने झाली होती. शिक्षिका ऑनलाइ ट्रेडिंगशी संबंधित एक व्हिडिओ पाहत होती.

ज्यामध्ये कमी काळात जास्त नफा कमावण्याचा दावा केला जात होता. व्हिडिओमध्ये एक अॅप डाउनलोड करण्याचा सल्ला दिला होता. महिलेने ते ॲप फोनमध्ये इंस्टॉल केले, आणि गुंतवणूक सुरू केली होती. सुरुवातीला या महिललेला छोटे फायदे मिळाले. यामुळे तिचा विश्वास आणखी वाढला होता. काही दिवसांनंतर त्या महिलेला ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. तिथे स्वतःला एक्सपर्ट असल्याचे सांगणारे लोक शेअर बाजाराविषयी सल्ला देत होते.

ग्रुपमध्ये सतत फायद्याचे स्क्रीनशॉर्ट आणि सक्सेस स्टोरी शेअर केल्या जात होत्या. यामुळे महिलेला या सर्व गोष्टींवर विश्वास बसला होता. यावेळी तिला आणखी एक लिंक पाठवण्यात आली. तिने ते ॲप डाउनलोड केले आणि तिने आपल्या केवायसीची माहितीही त्यात भरली. यानंतर महिलेला एका ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले होते. या महिलेने ६  मार्च ते १४ मार्च या वेळात वेगवेगळ्या ट्रांझेक्शनच्या माध्यमातून एकूण १.७५ लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत.

ॲपमध्ये गुंतवणूक वाढताना दिसत होती, महिलेला नफाही दिसत होता. ज्यामुळे ती पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला काहीना काही कारण सांगून गोष्ट टाळण्यात आली आहे. अनेक प्रयत्न करुनही महिलेला नफा मिळाला नाही आणि तिची मूळ रक्कमही परत मिळाली नाही. यानंतर तिला कळाले की, तिची फसवणूक झाली आहे. यानंतर तिने सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आयटी फॅक्ट संबंधित कलम आणि भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेवरून स्पष्ट कळते की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसणारी प्रत्येक माहिती ही खरी नसते. ऑनलाइन गुंतवणूकीच्या नावावर मोठा फ्रॉड होऊ शकतो. यामुळेच सावध राहणे गरजेचे आहे. कर्नाटक राज्यामध्ये ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखली एका महिलेची सायबर फसवणुक करण्यात आली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा