गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंची राज्य सरकारवर टीका

SHARE:

अकोला – जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे असलेल्या माजी सरपंचाचा चक्कर येऊन मृत्यू झाला आहे. गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे, व राज्यातील सरकारवर जोरदार टभ्का केली आहे. अकोल्यातील मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागला आहे.

अकोल्यात गॅस सिलिंडरच्या रांगेत एका वृद्धाला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे. त्यावरून सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल असे सांगणार्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वात आधी माफी मागायला हवी असे रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांना त्यांचे नाव न घेता टीका केली आहे.

तसेच राज्यसरकारचे जे लोक सांगतात ना की राज्यात गॅस सिलिंडर आहेत त्यांना जरा हा फोटो दाखवा, असे रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत. व राज्यातील सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात काँग्रेस पक्षाचे आमदार आंदोलन करत असताना २५ दिवसांत गॅस सिलिंडर मिळतो, गॅस बूक करा असे विधान भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केले होते. त्यावरून रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावरती नाव न घेता टीका केली आहे.

अकोला जिल्ह्यातील मिर्झापूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे असलेल्या वृद्धाचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात राज्यातील सरकारविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोल्यातील मिर्झापूर येथील स्थानिक ग्रामस्थांनी ही सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. गॅसच्या रांगेत उभारेलेल्या मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा काल मृत्यू झाला आहे.

अकोल्यातील यदुराज गॅस एजन्सी येथे सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी ते रांगेत उभे असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले आहेत. या घटनेत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर नागरिकांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अकेल्यात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा आणि सरकारच्या चुकीमूळे पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा