व्यवसाय : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत असून सोने-चांदीच्य किंमतीवरही त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपसून सतत कमी-जास्त होणाऱ्या सोनं-चांदीचे आजचे दर काय आहेत ? जाणून घ्या भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी, ३० मार्च रोजी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाला पाचवा आठवडा सुरू झाल्याने बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. ब्लूमबर्गच्या मते, या दबावामुळे आज सोन्याचा भाव सुमारे १.३८% ने घसरून ४४६२ डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भाव २% घसरून ६८.३ डॉलर प्रति औंस पातळीवर पोहोचला. भारतातही सोनं-चादींच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. आज, ३० मार्चच्या सकाळी, राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४८,२१० रुपयांपर्यंत घसरला. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅमसाठी १, ४८,०८० रुपये आहे. एका आठवड्यात २४ कॅरेट सोने २१०० रुपयांनी महाग झालं आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या भावात १९५० रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव १९०० रुपयांनी किंवा १.३ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅमसाठी १, ४७,८०० रुपयांवर आला होता.
देशातील काही महत्वाच्या शहरातील सोन्याचे दर
दिल्लीत सोन्याचा भाव :
दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख ४८ हजार २१० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १, ३५, ८९० रुपये इतका आहे.
मुंबई आणि कलकत्ता :
सध्या मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता येथे २२ कॅरेट सोन्याची किंमत १,३५ ,७४० रुपये प्रति १० अशी आहे, तर २४ कॅरेट सोनं हे १,४८,०८० रुपयांनी मिळत आहे.
चेन्नईमध्ये सोन्याची किंमत :
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४९ ,०१० , तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ ,३६,५९० आहे.
पुणे आणि बंगळुरूमध्ये दर :
या दोन शहरांमध्ये, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४८,०८० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३५, ७४० रुपये आहे.

चांदीचे दर
सोन्याप्रमाणेच चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही घसरण होताना दिसत आहे. ३० मार्चच्या सकाळी, चांदीची किंमत प्रति किलोग्रामसाठी २,४४,९०० रुपयांपर्यंत घसरली आहे. गेल्या आठवड्यात चढ-उतार पाहिल्यानंतर, चांदीची किंमत अखेर आठवड्याभरापूर्वीच्या पातळीवर स्थिरावली. शुक्रवारी, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत ११,२५० रुपययांनी किंवा सुमारे ५ टक्क्यांनी घसरून प्रति किलोग्राम २,३०,००० रुपयांवर आली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस ६८.९ डॉलर आहे. यावर्षी जानेवारीमध्ये चांदीच्या किमतीने ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.





