पुणे – नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पत्नी व निकटवर्तीयांच्या नावे मोठी मालमत्ता असल्याची माहीती मिळाली आहे, तर राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता घेतल्याचे उघड झाले आहे. भोंदू खरातची पुण्यात ही मोठी मालमत्ता आहे. तर भोंदू अशोक खरात हा चेक नाही, फक्त कॅशने व्यवहार करत होता. पुण्यातील मॉडेल कॉलनीत मुलीच्या नावे १.२० कोटींचा आलिशान फ्लॅट आहे. भोंदू अशोक खरातने या फ्लॅटसाठी संबंधित बिल्डरला १ कोटी २० लाख रूपये रोख स्वरूपात दिले आहेत. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या नावे त्याच्या पत्नीच्या आणि निकटवर्तीयांच्या नावावरती मोठी मालमत्ता असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती देखील पुण्यातील मॉडेल कॉलनीत आलिशान इमारतीत ३ बीएचके फ्लॅट आहे. २४ रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीत ७ व्या मजल्यावर १०५५ चौरस फुटांचा आलिशान ३ बीएचके फ्लॅट आहे. हा फ्लॅट १३ सप्टेंबर २०२३ रोजी खरेदी केला असल्याची माहिती आता उघड झाली आहे. भोंदू अशोक खरातने या फ्लॅटसाठी संबंधित बिल्डरला १ कोटी २० लाख रूपये रोख स्वरूपात दिले आहे. चेकने व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही. भोंदू अशोक खरातने अनेक लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणुक करून, घाबरवून पैसे घेऊन राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता घेतल्याची माहिती मिळाली आहे.
पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत त्याच्या मुलीच्या नावे आलिशान फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. भोंदू अशोक खरात केवळ बारा लाखांचे उत्पन्न दाखवून आयकर भरत होता. तर भोंदू अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील आयकर विभागाला भोंदू अशोक खरातने कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा संशय आहे. राज्यातील आयकर विभागाकडून भोंदू अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. भोंदू अशोक खरातच्या राज्यभरातील एकुण संपत्तीची चौकशी सुरू आहे.भोंदू अशोक खरातच्या सीएची काल चौकशी झाली आहे, व परत भोंदू अशोक खरात समोर ही पुन्हा त्याच्या सीएची चौकशी होणार आहे.
भोंदू अशोक खरातची पत्नी फरार झाली आहे. मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री अशोक खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्याच्याविरोधात रोज नवीन तक्रारी दाखल होत आहेत. शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याने त्याच्या समोर त्याच्या मुलाची चौकशी होणार आहे. अशोक खरात सहकार्य करत नाही. सुरुवातीला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे. व एसआयटीकडून नंतर इतर गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे, असे नाशिक पोलिसांनी म्हटले आहे.





