शेकडो अकाउंटधारकांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवल्याचा प्रकार उघड; आयसीआयसीआय बँकेत गोल्ड लोनचा महाघोटाळा

SHARE:

नागपूर – आयसीआयसीआय बँकेत गोल्ड लोन घोटाळा झाला आहे, तर या प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या १९५ अकाउंटधारकांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरातील आयसीआयसीआय बँकेत गोल्ड लोन घोटाळा प्रकरणात बनावट दागिने तारण ठेवून २३ कोटींचं कर्ज घेतल्याचा प्रकार आता समोर आला आहे. नागपूरातील आयसीआयसीआय बँकेत गोल्ड लोन स्कॅम झाल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या बनावट खातेदार लोकांनी बनावट सोने गहाण ठेवून कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरमध्ये आयसीआयसीआय बँकेत २३ कोटी रुपयांचा गोल्ड लोन घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये काही लोकांनी नकली सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेतले होते. यामध्ये नागपूरमधील आयसीआयसीआय बँकेत १९५ अकाउंट धारकांनी बनावट सोन्याचे दागिणे तारण ठेवले होते. आणि मोठे कर्ज उचलल्याची माहिती मिळाली आहे.

पण नागपूरमधील आयसीआयसीआय बँकेत या बनावट सोन्यावर लोन मिळाले कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपूरमध्ये सोन्याचे मूल्यांकन करणाऱ्या व्हॅल्यूअर, ऑडिटर्सने देखील बनावट असणाऱ्या सोन्याला हिरवा झेंडा कसा काय दाखवला होता? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूरमधील या गोल्ड लोन घोटाळा प्रकरणामध्ये आयसीआयसीआय बँकेने तक्रार केल्यानंतर नागपूरमधील धंतोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरमधील धंतोली पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणात नागपूरमध्ये आयसीआयसीआय बँकेत गोल्ड लोन ऑडीट झाल्यानंतर हा गोल्ड लोन घोटाळा उघडकीस आला आहे. आयसीआयसीआय बँकेमध्ये गोल्ड लोन ऑडिट करण्यात आले होते. यानंतर नागपूरमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या ९  शाखांमध्ये १९५ खातेदारांनी बनावट दागिने देऊन गोल्ड लोन घेतल्याची माहिती मिळाली आहे. आली. जानेवारी २०२३  ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये हा आयसीआयसीआय गोल्ड लोन घोटाळा उघडकीस आला आहे.

नागपूर पोलिसांकडून या आयसीआयसीआय गोल्ड लोन घोटाळा प्रकरणामधील सर्व आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरमधील या आयसीआयसीआय गोल्ड लोन घोटाळा प्रकरणामध्ये आरोप केला जात आहे की, २०२३ पासून ऑक्टोबर २०२५  या कालावधीमध्ये १९५ अकाउंटधारकांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्हॅल्युअर आणि ऑडिटर्ससोबत मिळून हा गोल्ड लोन घोटाळा करण्याचा कट रचला आहे.

आयसीआयसीआय बँकेंच्या १९५ खातेदारांनी बनावट दागिने खरे असल्याचे सांगत आयसीआयसीआय बँकेकडून २३, १९, ६४,७५१  रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. नागपूर पोलिसांनी आयसीआयसीआय गोल्ड लोन घोटाळा प्रकरणामध्ये सर्व आरोपींच्या विरोधात कलम ४०६, ४०९, ४२०, ४६८, १२०  ब आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास नागपूर पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा