भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ९ पोलीस कर्मचाऱ्यांना मृत्युंदंडाची शिक्षा, पोलीस दलात खळबळ; लॉक डाउन मधे झाली होती पोलीस लॉक-अप मधे पिता पुत्राची हत्या

SHARE:

तामिळनाडू – कोरोना महामारीत लॉकडाऊन दरम्यान पोलिस कोठडीत झालेल्या बेदम मारहाणीमुळे बाप-लेकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ९ पोलिस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ६ वर्षांपूर्वीची ही घटना असून तामिळनाडूतील मदुराई जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला. एकाच वेळी ९ पोलीस कर्मचार्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जून २०२० मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळात सात्तानकुलम पोलिसांनी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांना रात्री उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून ताब्यात घेतले होते. कोठडीत असताना या पिता-पुत्राला पोलिसांनी अमानवीय पद्धतीने मारहाण केली होती. यामुळे गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते.

या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला असून, तपासादरम्यान पोलिसांनी केलेले अत्याचार आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न न्यायालयात सिद्ध झाले. सीबीआयने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानीवरून न्यायालयाने या नऊ पोलिसांना हत्त्येच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले आणि एकाचवेळी नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. सहा वर्ष चाललेल्या खटल्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे. या निकालामुळे पोलिसांच्या मनमानी कारभाराला मोठा चाप बसण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात दोषी ठरलेल्या नऊ पोलिसांमध्ये इन्स्पेक्टर एस. श्रीधर, सब-इन्स्पेक्टर पी. रघु गणेश आणि के. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन आणि ए. समादुराई, कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस आणि एस. वेलुमुथू यांचा समावेश आहे. इन्स्पेक्टर श्रीधर यांच्यावर २५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

हे प्रकरण तुतीकोरीन जिल्ह्यातील साथनकुलम येथील आहे. २०२० मध्ये लॉकडाऊनचे पालन न केल्याच्या शुल्लक कारणावरून व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेन्निक्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत मोबाईलचे दुकान सुरूच ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे या बाप- लेकाला अटक करून पोलिसांनी कोठडित त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे त्यांना गंभीर जखमा आणि रक्तस्त्रावही झाला. ज्यामुळे पी.जयराज आणि बेन्निक्स यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष महत्वाचा पुरावा ठरली. त्याशिवाय, पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठ्यांवर रक्ताचे डागही आढळले होते. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य सीआयडीने केला होता, परंतु मद्रास हायकोर्टाच्या निर्देशानंतर सीबीआयने तपास हाती घेतला. सीबीआयने एका इन्स्पेक्टर, दोन सब-इन्स्पेक्टर आणि अनेक पोलिसांना अटक केली होती. आरोपींवर खून, कट रचणे, पुरावा नष्ट करण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले. तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज देखील हटवण्यात आले. यामुळे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. तपासादरम्यान आरोपींपैकी एका पोलीस उपनिरीक्षकाचा कोविडमुळे मृत्यू झाला.

या प्रकरणातील सुनावणीत हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी पोलिसांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला, मात्र तो न्यायालयाने फेटाळून लावला. अखेरीस, हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीत मृत्यू झाला हे सिद्ध झाले. त्यामुळे मदुराई न्यायालयाने सर्व नऊ पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवत फाशीची शिखा सुनावण्यात आली.

Leave a Comment

अधिक वाचा