बीड – जिल्ह्यामध्ये १६ ठिकाणी सरपंच तर ७२ ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पोटनिवडणूका होणार आहे. बीड जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. यात केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीची निवडणुकी होणार आहे. बीडमध्ये ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत, तर मस्साजोग गावाची निवडणूक बिनविरोध होणार आहे, बीड जिल्ह्यात १६ ठिकाणी सरपंच तर ७२ ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.१३ एप्रिल २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत, तर बीड जिल्ह्यात २८ एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सदस्य, सरपंचाचे निधन, राजीनामा किंवा अपत्रातेमुळे रिक्त झालेल्या जागांसाठीचा हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील रिक्त झालेल्या एकूण ८८ ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होणार आहे. बीड जिल्ह्यातील निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार १३ एप्रिल २०२६ पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतील, तर २९ एप्रिल २०२६ रोजी मतमोजणी झाल्यानंतर या बीड जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुकांचा निकाल घोषित केला जाणार आहे. बीड जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतीपैकी मस्साजोग गावाचीही पोटनिवडणूक होणार आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मस्साजोग गावाचा ही बीड जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत समावेश आहे. मस्साजोग ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यात तालुकानिहाय ग्रामपंचायत पोट निवडणूका होणार आहेत. बीडमध्ये ११ ग्रामपंचायती, परळी-११ , आष्टी-११ , माजलगाव-९, गेवराई-८ , अंबाजोगाई-५, धारूर-७, पाटोदा-७ , शिरूर-४, आणि वडवणी-१ ग्रामपंचायत मिळुन या निवडणूका होणार आहेत. तर बीड जिल्ह्यातील १६ सरपंच तर ७२ ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण ८८ जागांसाठी बीड जिल्ह्यात पोटनिवडणूका होणार आहे, असे निवडणुक आयोगाने म्हटले आहे.





