तामिळनाडूत एकही पक्षाने ब्राह्मणांना उमेदवारी दिली नाही; निवडणुकीत फायदा दिसत नसल्यामुळे सर्वच पक्षांनी घेतला निर्णय

SHARE:

नवी दिल्ली – तामिळनाडूत ब्राह्मणांची लोकसंख्या एकूण संख्येच्या ३ टक्के आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता या ब्राह्मण होत्या. त्यांच्या निधनानंतर जवळपास १० वर्षांत, एआयएडीएमकेने ब्राह्मण समाजातील केवळ एकाच उमेदवाराला उमेदवारी दिली. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत कोणत्याही प्रमुख पक्षांनी ब्राह्मण उमेदवारांना तिकीत दिले नाही. एआयएडीएमकेचा मित्रपक्ष भाजपला तामिळनाडू ब्राह्मण संघटनेचा पाठिंबा असूनही, पक्षाने २७ जागांपैकी एकाही जागेवर ब्राह्मण उमेदवाराला उभे केलेले नाही. हे ब्राह्मण समाजाच्या घटत्या प्रभावाचे द्योतक मानले जात आहे.

अनेक दशकांपासून तामिळनाडूच्या राजकारणात एआयएडीएमकेला ब्राह्मणांचा पाठिंबा होता. सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या जे. जयललिता या ब्राह्मण होत्या. जयललिता यांच्या निधनानंतर, ब्राह्मण मतदार भाजपकडे वळले. परिणामी, आता एआयएडीएमकेला ब्राह्मण उमेदवार उभे करण्यात निवडणुकीत फायदा दिसत नसावा. यामुळेचे ब्राह्मणांचे पक्ष असूनही भाजप काँग्रेसनेही तामिळनाडूमध्ये एकाही ब्राह्मण उमेदवाराला तिकीट दिले नाही.

डीएमकेने ब्राह्मणांना तिकीट दिले नाही, ही बाब समजण्यासारखी आहे, कारण डीएमके ही ब्राह्मणविरोधी पार्टी आहे. मात्र ब्राह्मण समर्थक पक्ष असूनही आणि राज्यात तामिळनाडू ब्राह्मण संघटनेचा पाठिंबा असूनही भाजपने देखील एकाही ब्राह्मणाला विधानसभेची उमेदवारी दिली नाही. तसेच ब्राह्माणांचा पक्ष असलेल्या कांग्रेसने देखील ब्राह्मणांना उमेदवारी दिली नाही.

तामिळनाडूतील २३४ विधानसभा जागांपैकी, द्रमुक १६४ जागांवर आणि काँग्रेस २८ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर एआयएडीएमके १७८ जागांवर, भाजप २७ जागांवर आणि पीएमके १८ जागांवर निवडणूक लढवत आहे, परंतु या पक्षांनी एकाही ब्राह्मण उमेदवाराला तिकीट दिले नाही. हा प्रकार तामिळनाडूच्या बदलत्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब आहे.

राज्यातील एकूण मतदारांपैकी ब्राह्मण ३ टक्के आहेत. राज्यातील राजकारणात ओबीसी आणि अनु.जाती मतदार निर्णायक भूमिकेत आहेत, त्यामुळेच त्यांनी एकाही ब्राह्मणाला तिकीट दिले नाही. ब्राह्मणाला उमेदवारी दिल्यास अनु.जाती आणि ओबीसींचे मतदार दूर जातील, अशी भीती त्यांना वाटते, म्हणूनच भाजपने एकाही ब्राह्मणाला त्यांना तिकीट देण्यास नकार दिला आहे.

अभिनेते-राजकारणी थलपथी विजय यांच्या पक्षाने, तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके), दोन ब्राह्मण उमेदवार उभे केले आहेत. तर तमिळ राष्ट्रवादी नेते सीमान यांच्या पक्षाने, सहा ब्राह्मण उमेदवार उभे केले आहेत. जिथे ब्राह्मण मतदार बहुसंख्य आहेत. ब्राह्मण मतदार निर्णायक भूमिका बजावतात. म्हणूनच टीव्हीके आणि एनटीकेने ब्राह्मणांना तिकीट देऊन त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, तमिळ राजकारणात ब्राह्मण मतदारांनी दीर्घकाळापासून एआयएडीएमकेला पाठिंबा दिला आहे, त्यांना मतदान करून सत्तेवर आणले आहे. परिणामी, जयललिता आणि एम.जी.आर. यांनी नेहमीच ब्राह्मण उमेदवारांना उमेदवारी दिली. अलिकडच्या वर्षांत हे चित्र बदलले आहे. माजी मुख्यमंत्री जयललितांच्या मृत्यूनंतर ब्राह्मणांचा कल भाजपच्या दिशेने वाढत आहे. परिणामी, पक्षाला आता ब्राह्मण उमेदवारांना उमेदवारी देण्यात निवडणुकीत फायदा दिसत नाही. त्यामुळे, एआयएडीएमकेने ब्राह्मणांना तिकीट देणे टाळले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा