हिंगोली – जिल्ह्यात मध्यप्रदेशातील बनावट रेल्वे पोलिसांच्या टोळीचा भांंडाफोड करण्यात आला आहे, याप्रकरणात ३ जणांना अटक करण्यात आले आहे, आणि एक आरोपी फरार झाला आहे. हिंगोलीत बनावट रेल्वे पोलिस बनून पोलिसांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशातील बनावट पोलिसांची टोळीला हिंगोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात मध्य प्रदेशातील या टोळीने देशभरात अशाच प्रकारे अनेकांची आर्थिक फसवणुक केल्याची माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांच्या नावाने सामान्य नागरिकांची ही फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
हिंगोलीमध्ये पोलिसांनाच फसवणार्या टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. बनावट रेल्वे पोलीस बनून पोलीस अधिकाऱ्यांकडून पैसे घेणार्या मध्यप्रदेशातील टोळीचा हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडून भांडाफोड करण्यात आला आहे. आरोपी हे बनावट अपघाताची कथा सांगून नागरिकांची फसवणूक करत होते. या प्रकरणात एक आरोपी अज्ञात क्रमांकावरून फोन करत स्वतःची ओळख खंडवा रेल्वे स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार अशी करून देत होता. ते बनावट रेल्वे अपघाताची कथा सांगून संबंधित नागरिकांना भावनिकपणे जाळ्यात अडकवुन फसवत होते.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रेमप्रकाश माकोडे यांनाही असा फोन आला होता. खंडवा येथे कळमनुरीतील एका मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. मृतदेह पाठवण्यासाठी आइस बॉक्स खरेदी करायचा आहे, असे सांगत ५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. कळमनुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रेमप्रकाश माकोडे यांनी पैसे पाठवले होते. असाच प्रकार हिंगोलीमधील वसमत ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासोबत घडला आहे. मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी घटनेची खात्री केली.
तपासामध्ये खंडवा येथे असा कोणताही अपघात घडलेला नसल्याचे समोर आले आहे. आणि या आरोपीचा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर हिंगोली पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने चौकशी केली आहे. चौकशीत या बनावट रेल्वे पोलिस टोळीचे धागेदोरे मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. हिंगोली पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन मध्यप्रदेशातील स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने कडक कारवाई केली आहे. या कारवाईत अमित कुर्मी, वीरसिंग गौंड आणि भारत कुर्मी या ३ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील सीताराम कुर्मी हा एक आरोपी अद्याप फरार आहे.
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा पोलिस फारार आरोपीचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासात या टोळीने देशभरात अशाच प्रकारे अनेक नागरिकांची मोठी आर्थिक फसवणुक केल्याची माहिती समोर मिळाली आहे. पोलिसांनाच फसवणार्या या मध्यप्रदेशातील बनावट रेल्वे पोलिस टोळीचा भांडाफोड झाला आहे. तरी अशा घटनांपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. कारण मदतीच्या नावाखाली फसवणूक करणार्या टोळ्या सक्रिय आहेत. नागरिकांनी कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित माहितीची चौकशी करणे गरजेचे आहे, असा इशारा हिगोली पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणात अधिक तपास हिंगोली पोलिस करत आहेत.





