सुनेत्रा पवारांसाठी बारामतीची पोटनिवडणूक अपेक्षेपेक्षा अवघड ठरणार; ५५ उमेदवारी अर्ज दाखल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस

SHARE:

बारामती – पोटनिवडणूकीत ५५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर सुनेत्रा पवारांसाठी बारामतीची पोटनिवडणूक अपेक्षेपेक्षा अवघड ठरणार आहे. कारण बारामतीत ५५  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसनेही उमेदवार दिला आहे. सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामतीची पोटनिवडणूक अपेक्षेपेक्षा अवघड ठरताना दिसत आहे. राज्यात बारामतीची निवडणुक सुरुवातीला बिनविरोध होईल अशी वाटणारी बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आता मोठी लढत होणार आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे सुनेत्रा पवार यांना सहानुभूती मिळेल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल, असा महायुतीचा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात ५५ उमेदवार उतरले आहेत. तर काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती पोटनिवडणुक ही अपेक्षेइतकी सोपी राहिलेली नाही. सुनेत्रा पवार यांनी ६  एप्रिल २०२६ रोजी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची सूत्रे आपल्या हातात ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. यानंतर त्यांनी बारामतीच्या रिक्त जागेवरुन पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. बारामती पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे.

तर ४ मे २०२६ रोजी या बारामतीतील पेटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि बिग बॉसमधील स्पर्धक अभिजित बिचुकले यांनीही उमदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवल्याने सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा