चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश; माजी मंत्री व काँग्रेस कार्यसमिती सदस्य नसीम खान यांच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय

SHARE:

मुंबई – चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. राज्यात आता ईव्हीएम मशीनची तपासणी आणि छाननी होणार आहे. मुंबई हायकोर्टाकडून हा आदेश देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. भारतात ५  राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. पण प्रत्येक निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थिती केले जातात. महाराष्ट्रात सुद्धा ईव्हीएम मशीनविरोधात राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेबद्दल आक्षेप घेतला आहे.

आता ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. २०२४ च्या महाराष्टातील्र विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला होता. चांदिवली मतदारसंघाचे नसीम खान यांनी निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले आहे की, भारताच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडलेले नाही की, निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीनची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. मुंबई उच्च न्यायायलयाचा हा एक ऐतिहासिक आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल २०२४ मधील निकालाचा संदर्भ देत नसीम खान म्हणाले आहेत की, या निकालानुसार, निवडणुकीतील निकालांच्या घोषणेनंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५  टक्के ईव्हीएममधील म्हणजेच कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि मधील बर्न झालेली मेमरी किंवा मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी ईव्हीएम उत्पादकांच्या अभियंत्यांच्या एका पथकाद्वारे केली जाईल. अशी माहिती नसीम खान यांनी दिली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उप-निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नसीम खान यांना पाठवलेल्या पत्रानुसार, ईव्हीएम मशीन उत्पादक कंपनी असलेल्या भारत इलेक्ट्रॉनक्स लिमिटेड, बंगळुरू यांच्यामार्फत १६ आणि १७ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत केवळ ईव्हीएम मशीन चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मशीन आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल युनिट्सची पडताळणी करून घेण्यास सांगितले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया विरोधी आघाडीतील उमेदवारांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामूळे आता राज्यात मुंबईमध्ये चांदिवली विधानसभा मतदार संघात ईव्हीएम मशीनची तपासणी आणि छाननी होणार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा