महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त चित्रा चौक येथे अभिवादन; नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीच्या वतीने पुष्पांजली अर्पण

SHARE:

अमरावती – नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांच्या जन्मदिनी चित्रा चौक येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. समता, शिक्षण व सामाजिक न्यायाच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. भारतातील महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते व सामाजिक समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल २०२६ रोजी नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावती यांच्या वतीने त्यांना सन्मानपूर्वक अभिवादन करण्यात आले.

या निमित्ताने सकाळी ८  वाजता चित्रा चौक येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांनी समाजात समता, बंधुता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित केली असल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना शिक्षण व स्वाभिमानाचा मार्ग खुला झाला, असेही यावेळी नमूद करण्यात आले.


महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि जातीय भेदभावाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला.

शेतकरी व कामगार वर्गाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा आणि समाजपरिवर्तनासाठी केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समता, मानवता आणि शिक्षणाचा प्रसार करणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमात नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीचे अध्यक्ष मा. गणेश मुंधरे, सचिव मा. सतीश ढोरे, सन्मानित सदस्य मा. किशोर पेंढारकर, मा. रुपेश वानखडे, मा. प्रियंका मुंधरे, मा. दिपाली ढेवले, मा. राहुल खोडके, मा. रुपाली खोडके, मा. विक्रांत सातारकर, मा. निलू दास, मा. गुंजन दास, कु. माही वानखड़े तसेच समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी महात्मा फुले यांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याचा आणि सामाजिक न्याय, समता व शिक्षणाच्या मूल्यांना बळकटी देण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Comment

अधिक वाचा