मुंबई – देशात पाच राज्यात निवडणूका असताना महिला विधेयक आणणे हा भाजपा सरकारचा डाव आहे, असा ठाकरेगट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हे नारीशक्ती नव्हे तर भाजपशक्ती विधेय आहे. संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. महिला आरक्षण लागू करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन पुढील २ दिवस चालणार आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू करण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात आले आहे.
लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यासाठी संविधानात दुरुस्ती करण्यात येणार आहे. लोकसभेत ५४३ खासदार आहेत, मात्र ही संख्या वाढून ८५० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच, महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागाही ४८ वरून ७२ पर्यंत वाढू शकतात, अशी शक्यता आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशभरात पाच राज्यात निवडणुका असताना नारीशक्ती विधेयक आणण्याची गरज नाही.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, हे नारीशक्ती विधेयक नसून भाजपशक्ती विधेयक आहे. केंद्रातील भाजपा सरकार देशाला फसवत आहे. संजय राऊत म्हणाले की, हे विधेयक सप्टेंबर २०२३ साली मंजूर झाले आहे. केंद्रातील भाजपा सरकार देशातील जनतेला फसवत आहे. देशात जे विधेयक २०२६ साली मंजूर झाले आहे. त्या विधेयकात जनगणनेबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर चर्चा केली नाही. २०११ नुसार विधेयक लागू होईल, असे सांगण्यात आले. महिलांना ३३ टक्के आरक्षण ५४३ खासदारांच्यामध्ये द्या. देशात ८०० पेक्षा जास्त खासदार तुमच्या मनाप्रमाणे तयार करणार आहात का?
देशातील मतदारसंघ तोडून ८०० पेक्षा जास्त खासदार निर्माण करून तुम्हाला हे महिला आरक्षण बिल जनतेवर थोपवायचे आहे. आमचा त्याला विरोध आहे. हे नारीशक्ती विधेयक नसून हे फक्त भाजपशक्ती विधेयक आहे. हे भाजपशक्ती विधेयक आम्ही संसदेत मंजूर होऊ देणार नाही, असा इशारा ठाकरेगट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारला दिला आहे. देशभरात पाच राज्यात निवडणूका असताना हे महिला आरक्षण विधेयक आणणे हा केंद्रातील भाजपा सरकारचा डाव आहे. देशात पाच राज्यात निवडणूका असताना हे विधेयक आणणे गरजेचे नव्हते.
देशात महिला आरक्षण विधेयक मंजूर करताना जे कट-कारस्थान हे केंद्रातील भाजपा सरकार करत आहे, त्यांनी मोठ्या इतिहासाच्या गोष्टी करू नये. मतदानातून हे महिला आरक्षण बिल नाकारले जाईल. अशा वेळी हे महिला आरक्षण बिल सहज मंजूर होईल या भ्रमात कोणीही राहू नये, असे ठाकरेगट शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.





