पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. हा प्रकार थेट विमानात घडला.

SHARE:

आंतरराष्ट्रीय : इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान पुढे पुढे करताना दिसत आहे. पाकिस्तानला कोणत्याही स्थितीमध्ये युद्धबंदी करार घडवून आणायचे आहेत. त्यामागे त्यांचा मोठा डाव आहे. यादरम्यानच पाकिस्तानचे पंतप्रधान चांगलेच तोंडावर पडले आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तानने पागलपणा लावला आहे. युएईने पाकिस्तानला पैसे परत करण्याचा इशारा दिला. त्यानंतर वेगवेगळ्या देशात भिकेचा कटोरा घेऊन पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ फिरत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात युद्धबंदी करार घडवून आणणाऱ्या पाकिस्तानचे खायचे वांदे आहेत. यादरम्यानच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ कतारला पोहोचले. त्यांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जसे ही त्यांचे विमान कतारच्या एअरस्पेसमध्ये दाखल झाले, तसे एअरफोर्सच्या फायटर जेट्सला एस्कॉर्ट केले. शरीफ हे थेट विमानातूनच सलामी देताना दिसले. त्यांचा हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाचारगिरी नक्की किती पत्कारली पाहिजे, याची तूफान चर्चा होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

अनेकांनी मजाक उडवला आहे. कतारमध्ये शहबाज शरीफ यांचे सन्मापूर्वक स्वागत करण्यात आले दोहा एअरपोर्टवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी ते दाैऱ्यावर आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान सुरूवातीपासूनच पुढाकार घेत आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जगापुढे आपली इज्जत घातल्याचे बघायला मिळत आहे.

पाकिस्तानात इराण आणि अमेरिका युद्धाची शांतता करार बैठक झाली. पण या बैठकीतून काहीच तोडगा निघू शकला नाही. बैठकीत यश न मिळाल्याने पाकिस्तानने थेट होर्मुज खाडीत नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला. होर्मुज खाडीत स्थिती भयंकर होत आहे. इराणचे जहाजही त्यांच्या बंदरातून बाहेर निघू शकत नाहीत. इराणकडून काही मुद्दे मान्य करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला.

अमेरिकेचे अध्यक्ष शांतता करारानंतर पाकिस्तान दाैऱ्यावर जाण्याचे संकेत आहेत. पाकिस्तानला धक्का देत अमेरिकेच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचेही सांगितले. नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर चांगला संवाद झाला. आमच्या सध्याच्या परिस्थितीवर ४० मिनिटे चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. आता शहबाज शरीफ कतारच्या दाैऱ्यावर आहेत. कतारमधून मोठ्या प्रमाणात भारतात एलपीजी गॅस आयात होतो. युद्धात कतारचेही नुकसान झाले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा