अत्यंत धक्कादायक! अमरावतीच्या परवाड्यात एका २२ वर्षांच्या तरुणाने ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केला.

SHARE:

अमरावती : सध्या सगळ्या राज्यात अमरावती जिल्ह्यातील परतवाडा प्रकरण गाजत आहे. आरोपी अयान अहमदने कशा प्रकारे तरुणींचं लैंगिक शोषण केलं. त्यांचे व्हिडिओ बनवले. आता याच परतवाड्यात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणाने राज्याला हादरवून सोडलं आहे. सगळीकडे या गुन्ह्याची चर्चा असतानाच अमरावतीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेवर अत्याचार करून पैसे लुटणाऱ्या आरोपीला अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा पोलिसांनी अटक केली आहे. आवेज युसुफ खान असं आरोपीचं नाव असून तो २२ वर्षांचा आहे. मिल्लतनगर परतवाडा येथे तो रहायला आहे.

१८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उपचारासाठी जात असलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला आरोपीने दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करून ६०० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली.घटनेनंतर पीडित महिलेला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.पीडितेच्या जबाबावरून शिरजगाव कसबा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. परतवाडा येथून आरोपीला पोलिसांनी ११ तासात अटक केली.

अयान अहमदला कृत्याचा पश्चातापही नाही

याच अमरावतीच्या परतवाडा मधील अयान अहमद या आरोपीने तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण राज्यभरात गाजत आहे. आरोपी अयान अहमदला केलेल्या कृत्याचा पश्चातापही नाही. केलेल्या कृत्याबद्दल त्याने अजूनही खंत बोलून दाखवली नाही. पोलीस चौकशीत माहिती उघड झाली आहे. आरोपी अयान एसआयटी चौकशीत सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती. मुलींसोबत संवाद कसा साधायचा, त्यांना जाळ्यात कसं ओढायचं याची कबुली पोलिसांना त्यांने दिली आहे. स्वतःच्या बचावासाठी अमरावतीच्या फ्लॅटवर जे कृत्य झालं ते दोघांच्याही संमतीने झाल्याचा केविलवाणा दावा आरोपी अयानने केला आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचा तगादा

जळगावात अल्पवयीन विद्यार्थिनीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचा तगादा लावल्याचा प्रकार समोर. तरुणाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताने पीडितेच्या घराच्या खिडकीवर दगडफेक करून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद. संशयित रोहन पाटीलवर पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये पोलिसात गुन्हा दाखल केला.

Leave a Comment

अधिक वाचा