टीएमसीच्या खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला, भाजपा कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

SHARE:

पश्चिम बंगाल – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी टीएमसीने भाजपवर हिंसाचार आणि गुंडगिरीचे गंभीर आरोप केले आहेत. खासदार मिताली बाग यांनी फेसबुक लाईव्ह व्हिडिओद्वारे दावा केला की, सोमवारी हुगळी जिल्ह्यात आरामबाग येथील निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. प्रचारादरम्यान त्यांच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात काठ्या आणि दंडुक्यांचा वापर करण्यात आला. भाजपचे कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. या घटनेत खासदार आणि त्यांचे चालक जखमी झाले.

टीएमसीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आरोप केला आहे की पक्षाच्या खासदार मिताली बाग यांच्या गाडीवर हल्ला झाला. टीएमसीचा दावा आहे की पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी जात असताना मिताली बाग यांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. पक्षाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

गाडीच्या काचा फुटल्या आणि खराब झाल्याचे वृत्त आहे. पक्षाने याला एका निवडून आलेल्या प्रतिनिधीवर, विशेषतः अनुसूचित जाती समुदायातील महिला खासदारावर झालेला भ्याड हल्ला म्हटले आहे. पक्षाने दावा केला आहे की त्यांच्या खासदारावर हल्ला झाला आणि त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. टीएमसीने म्हटले आहे की निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने भाजप हिंसाचाराचा मार्ग अवलंबत आहे.

टीएमसीने ट्विट केले की गृहमंत्री अमित शाह यांनी धमकी दिली होती कि जे घरातून बाहेर पडतील त्यांना उलटे लटकवल जाईल. याच धमकीनंतर हा हल्ला झाला. मिताली सध्या आरामबाग मेडिकल कॉलेज रुग्णालयात असून, अभिषेक बॅनर्जीने तिची भेट घेतली आहे. टीएमसी खासदार मिताली बाग यांच्यावरील हल्ल्यामुळे संपूर्ण बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी हल्लेखोरांना उघड इशारा दिला असून ४ मे नंतर प्रत्येकाला जबाबदार धरले जाईल, असे म्हटले आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी कठोरपणे सांगितले की मितालीवर हल्ला करणाऱ्यांबद्दल त्यांच्याकडे संपूर्ण माहिती आहे. त्यांनी सांगितले की सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जाईल आणि प्रत्येक हल्लेखोराची ओळख पटवली जाईल. त्यांनी असेही सांगितले की मिताली बाग या अनुसूचित जातीच्या महिला नेत्या आहेत आणि त्यांच्यावर हल्ला करणे ही आणखी गंभीर बाब आहे.
अभिषेकने पुढे सांगितले की ४ मे नंतर आरामबागमध्ये टीएमसी जिंकली किंवा हरली तरी, ते त्या भागाची वैयक्तिक जबाबदारी घेतील. त्यांनी भाजप नेत्यांना थेट आव्हान देत म्हटले की ४ मे रोजी दुपारी १२ नंतर त्यांना दिसेल की कोणत्या भाजप नेत्यामध्ये हिंमत आहे आणि दिल्लीतील कोणता भाजप नेता त्यांच्यासोबत उभा राहील.

Leave a Comment