बँकेच्या वसुली एजंटांकडून जोडप्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; कर्जाचा हप्ता भरण्यास विलंब झाल्यामुळे घडली घटना

SHARE:

पूणे – कर्ज वसुली करण्यासाठी आरबीआयने बँकांना काही नियम घालून दिलेले आहे. कर्जदाराला धमकी, शारीरिक त्रास, मारहाण किंवा कर्जदाराच्या घरी रात्री बेरात्री जाऊन कर्ज वसुली करण्यावर बंदी आहे. इतकेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने देखील या स्पष्ट केले आहे कि बँका बळाचा वापर करून कर्जाची वसुली करू शकत नाहीत. मात्र या नियमांना किंवा आदेशाला हरताळ फासणारी एक घटना पुण्यातून समोर आली आहे. येथे कर्जाचा हप्ता भरण्यास उशीर झाला म्हणून बँकेच्या वसूली एजंटांनी एक जोडप्याला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पूणे शहरातील हडपसर परिसरात ही घटना घडली.

या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओत आरोपी भर रस्त्यात संबंधित व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून कर्ज वसुलीच्या पद्धतींवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी इंडस्लंड बँकेच्या च्या तीन वसूनी एजंटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप जामदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कर्ज वसुलीच्या नावाखाली धमकावत मारहाण केल्याप्रकरणी जय सुहास कासार, विनीत सुहास कासार आणि तनिष्क हरीश खुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करून राज्याच्या गृह विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

माहित असावे कि बँकेच्या कर्ज वसुलीसाठी आरबीआयने काही नियम घालून दिलेले आहेत. जसे कि वसुली एजंट्सनी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेतच संपर्क साधावा, थकबाकीदाराला मालमत्ता जप्त करण्यापूर्वी किंवा कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे. वसुली एजंट्सना शिवीगाळ, धमकावणे, शारीरिक बळजबरी किंवा कर्जदाराचा अपमान करण्याची सक्त मनाई आहे. वसुली एजंट्सकडे बँकेचे अधिकृत ओळखपत्र आणि प्राधिकृत पत्र असणे आवश्यक आहे. जर वसुली एजंट गैरवर्तन करत असतील, तर तुम्ही त्याची तक्रार थेट पोलीस स्टेशन किंवा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू शकता.

Leave a Comment

अधिक वाचा