अमरावती – आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त नवजागरण मनीषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावती यांच्या वतीने गरजू व मजूर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्लिश स्पीकिंग क्लासचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
इंग्रजी भाषेची भीती दूर करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स असून सकाळी ७ ते ९ या वेळेत वर्ग घेण्यात येणार आहेत. तसेच हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे.
समिती कार्यालय, केडिया किराणा दुकानासमोर, अंबा मंगलम इमारतीच्या मागे, महावीर नगर येथे हे वर्ग सुरू होणार आहेत. ४५ दिवस नियमित उपस्थिती बंधनकारक असून २३ मार्च रोजी आयोजित निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी समितीचे गणेश मुंधरे (९५७९३९४६४) व सतीश ढोरे (९६०४५१०१५३) यांच्याशी संपर्क साधावा.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास मिळून त्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक प्रगतीस चालना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले






