मुंबई – पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका संपताच देशात महागाईचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांनी वाढ केली आहे. ३ महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात झालेली ही तिसरी मोठी वाढ आहे. या दरवाढीचा हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि चहाच्या टपरी व्यावसायिकांना याचा मोठा फटका असणार आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री लागणार असून बाहेरून जेवण मागवणे महाग होण्याची शक्यता आहे.
तामिळनाडू, पच्छिम बंगालसह ५ राज्यांमधील निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहेत. मात्र यापूर्वीच देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा शॉक लागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांनी वाढ केली आहे. ३ महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात झालेली ही तिसरी मोठी वाढ आहे.त्यामुळे दिल्ली, मुंबईसह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत थेट ३००० रूपयांवर पोहोचली आहे.
सरकारी तेल कंपन्यांच्या आकडेवारीनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात वाढ आहे. दिल्लीसारख्या महानगरांमध्ये गॅस सिलेंडरची किंमत सुमारे १००० रुपयांनी वाढली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत २०३१ रुपयांवरून थेट ३०२४ रुपयांवर पोहोचली आहे. राजधानी दिल्लीमध्ये ३०७१.५० रूपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत २२०८ रुपयांवरून वाढून थेट ३२०२ रुपयांवर पोहोचली आहे. तर चेन्नईमध्ये ३२३७ रुपयांवर पोहोचली आहे.
या दरवाढीचा हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि चहाच्या टपरी व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. व्यावसायिक गॅस महागल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक ही दरवाढ ग्राहकांवर लादण्याची शक्यता असूनया दरवाढीमुळे बाहेरचे खाणे महाग होण्याची शक्यता असून बाहेरचे खाणार्यांना आपला खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे. याशिवाय व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीमुळे लग्नसराईच्या काळात जनतेला मोठा फटका बसणार आहे. तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा आधीच तुटवडा असताना, या दरवाढीमुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.






