नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील झाशी येथे बुंदेली लोकगायिका लाडकुंवर उर्फ लवली कुशवाह यांची हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी लवली यांची हत्याच केली नाही तर शरिराचे तुकडे केले. इतकेच नाही, तर ओळख लपवण्यासाठी त्यांनी मृतदेह जाळून टाकला. मृतदेह पाहून केवळ कुटुंबीयांनाच नव्हे, तर पोलिसांनाही धक्का बसला. परिस्थिती इतकी गंभीर होती की गायिकेच्या पतीलाही मृतदेहाची ओळख पटवता आली नाही. सुनांनी त्यांच्या चपला, साडी, अंगठी आणि कपड्यांवरून कशीबशी ओळख पटवली.
मोहन कुशवाहा यांनी सांगितले की त्यांची पत्नी लवली ७ मे रोजी संध्याकाळी काही कामासाठी घरातून बाहेर गेल्या होत्या. त्या परत आल्या नाहीत. कुटुंबीयांनी रात्रभर शोध घेतला, पण त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. शुक्रवारी, जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्यावर ते आणि त्याचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले, पण मृतदेह ओळखण्यासारखा नव्हता. कसेबसे तिच्या सुनांनी तिला ओळखले. मोहन कुशवाहा म्हणाले कि तिच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नव्हता. तिला इतक्या निर्घृणपणे कोणी आणि का मारले, हे समजून येत नाही. तिची हत्या करण्यात आली. असा दावा मोहन कुशवाह यांनी केला.
पती मोहनलाल कुशवाहा यांनी सांगितले की, त्यांची पत्नी लाडकुंवर, जी श्लवली मौर्यश् नावानेही ओळखली जात होती, एक बुंदेली लोकगायिका होती आणि लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये गाणी सादर करत असे. ती बुंदेली संस्कृती आणि लोकपरंपरांशी संबंधित गाणी स्वतःच्या शैलीत सादर करत असे. परिसरातील लोकांमध्ये ती लवली मौर्य या नावानेही ओळखली जात होती.
घटनेच्या ठिकाणाजवळच्या एका शेतात पोलिसांना दारूच्या रिकाम्या बाटल्या, बिअरचे कॅन आणि एक जळालेला मोबाईल फोन सापडला. काटेरी तारेत अडकलेला लाल कापडाचा एक फाटलेला तुकडाही आढळला.
पोलिसांचा असा विश्वास आहे की त्या महिलेला एका वाहनातून निर्जन ठिकाणी आणण्यात आले होते. गावकऱ्यांनी घटनेच्या रात्री परिसरात एक संशयास्पद पांढरी कार पाहिल्याचेही सांगितले आहे. पोलीस जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजची तपासणी करत आहेत. पोलिस तपासात पूर्वीचे कोणाशी वाद किंवा वैर होते का, याचाही तपास सुरू आहे. सध्या पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत.






