कांदा आंदोलनाचे रौद्र रूप; नेत्यांसह कार्यकर्त्यांचा सरकारविरोधात तीव्र निषेध

SHARE:

नाशिक – चांदवडमधे दरवाढीचे शेतकरी आंदोलन चिघळले आहे, तर आंदोलक कार्यकर्ते आणि नेत्यांनी सरकारविरोधात्र निषेध व्यक्त केला आहे. राज्यात कांद्याच्या दरावरून चांदवडमध्ये आंदोलन चिघळले आहे.आमदार रोहित पवार, आमदार दानवेंसह, आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलिसांनी अटक केले आहे. नाशिकच्या चांदवड येथे कांद्याच्या दरवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन चिघळल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. कांदा शेतकरी आंदोलकांनी गाडीची हवा सोडली आहे. टायरची जाळपोळ केली आहे.

शेतकरी बांधवांनी कष्टाने पिकवलेल्या कांद्याला बाजारात मातीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील शेतकरी कमालीचा संतप्त झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या याच प्रश्नावर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडी तर्फे कांदा दरवाढीसाठी जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलक कार्यकर्ते आणि नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून राज्य सरकार विरोधात निषेध व्यक्त केला आहे. तर कांद्याच्या दरावरून नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये आंदोलन चिघळले आहे.

नाशिकमध्ये कांदा दरवाढीसाठी जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱी बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केले आहे. कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव मिळावा. आणि विकलेल्या कांद्याला 15 रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि भास्कर भगरे यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. या नाशिकमधील आंदोलनात बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, कांद्याला भाव मिळतोय का? सरकारचे नेते सांगतात की, येत्या काळात पाऊस पडणार नाही. तुमच्या कांद्याला भाव कसा मिळणार? नाफेडमध्ये सत्ताधाऱी लोकांचे बगलबच्चे कांदा खरेदी करत आहेत. कांदा दरवाढीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते कोणाला तिकीट द्यायचे, नगरसेवकांना किती रुपयात विकत घायचे, याचा विचार करत असल्याची चर्चा मुंबईमध्ये सुरू आहे.

6 हजार लोकांना पोलीस प्रशासनाने थांबवले आहे. आंदोलनाला येऊ देत नाही. त्या लोकांना तत्काळ सोडा. राज्य सरकार विरोधी पक्षाला हलक्यात घेत आहे. अजितदादांना या सरकारने न्याय दिला नाही. जे अजितदादांना न्याय देत नाही ते आपल्याला कसे देणार? कुंभमेळ्यांच्या कामांचे सगळे भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी राज्यसरकारला दिला आहे. नाशिकच्या चांदवड येथे कांद्याच्या दरवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन चिघळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको करत वाहनांच्या रांगांकडे धाव घेतल्याने तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आंदोलकांना विरोध करताच दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. दोन तासांहून अधिक काळ आंदोलन सुरू असताना शेतकरी संतप्त झाले आहेत. पोलिसांनी आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा