पुणे – जनगणनेचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. जनगणना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्या प्रकरणात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जनगणनेचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला 10 जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातील महर्षीनगर परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या पुणे महानगरपालिकेत कामाला आहेत. जनगणनेच्या कामासाठी ते त्या परिसरात गेल्या होत्या. 27 मे 2026 रोजी या घराघरांत माहिती गोळा करत होत्या. त्यवेळी आरोपींनी त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला.
तक्रारीनुसार, विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, अभिजीत मोरे यांच्यासह इतरांनी महिला कर्मचाऱ्याशी पहिला वाद घालत शिवीगाळ केली. दुसऱ्या दिवशी संबंधित कुटुंबाची समजूत काढण्यासाठी महिला कर्मचारी पुन्हा त्या भागात गेल्या होत्या. तेव्हा आरोपींनी त्यांच्या पाठीमागून येत दगडाने हल्ला केला आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणात विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, लीलावती मोरे, अभिजीत मोरे आणि इतर अनोळखी महिला-पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. राज्यातील जनगणना करणार्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. राज्यातील जनगणना कामात महिला कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या ताणतणाव आणि दुर्घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी कोल्हापूर, सांगोला आणि लातूर येथे जनगणनेचे काम करताना 3 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
अशा घटना वारंवार समोर आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जनगणना करणार्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी राज्यसरकारकडून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी महिला कर्मयारी करत आहेत. तसेच जनगणनेचे कर्तव्य बजावताना कर्मचार्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि नोकरी द्यावी, अशी मागणी राज्यातील शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






