पावसाळा डोक्यावर, पण हक्काचे छप्पर कुठे? मुंबईत १४० मराठी कुटुंबे आजही रस्त्यावर!

SHARE:

मुंबई – पावसाळा तोंडावर असताना मराठी माणूस बेघर झाला आहे, तर आहेत. मुंबईत 4 वर्षांनंतरही 140 मराठी कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असताना, हक्काचे घर गमावलेल्या या मराठी माणसांचे अश्रू पुसण्यास राज्यातील प्रशासनाला किंवा राजकीय नेत्यांना वेळ मिळाला नाही. मुंबईतील प्रभादेवी येथील राहणाऱ्या 140 मराठी कुटुंबांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. 2022 मध्ये प्रशासनाने धोकादायक इमारत असल्याचा दाखला देत येथील 4 निवासी इमारतींवर कारवाई केली होती.

मात्र, या कारवाईला आता जवळपास 4 वर्षे उलटून गेली, तरीही या कुटुंबांना ना हक्काचे पर्यायी घर मिळाले, ना राहण्यासाठी हक्काचे भाडे देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभादेवी कॉरिडोरचे भूमीपूजन करण्यात आले होते. त्या काळात ही या नागरिकांनी आपल्या प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आता परत धोकादायक ठरवलेल्या इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे आता मराठी माणसाचे संसार उघड्यावर आले आहेत.

पिढ्यानपिढ्या आणि मुंबईतील प्रभादेवी पुरूषोत्तमवाडी येथे राहणाऱ्या या मराठी माणसांचा संसार प्रशासकीय आदेशामुळे उघड्यावर आला आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडे या समस्या मांडल्या आहेत. येथील स्थानिक रहिवाशांनी बरेच वेळा राजकीय नेत्यांना मदत मागितली आहे. राजकीय लोकांनी लक्ष दिले नाही. प्रभादेवी स्थानिक आमदारापासून ते खासदारांपर्यंत प्रत्येक राजकीय नेत्याकडे येथील समस्येचा वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे.

आश्वासने देणार्या राजकीय नेत्यांनी निवडणुका संपताच या मुंबईतील प्रभादेवी रोडवरील पुरूषोत्तमवाडी परिसरातील 140 मराठी कुटुंबांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आमचा स्थानिक रहिवाशांचा वापर होतो, पण संकट काळात आम्ही जगलो काय, किंवा मरून गेलो काय, याच्याशी कोणालाही देणे घेणे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील स्थानिक रहिवाशंानी व्यक्त केली आहे.

4 वर्षांपासून केवळ पोकळ आश्वासने राजकीय नेते देत आहेत. येथील मराठी बांधवांनी आता राज्यातील प्रशासनाविरुद्ध आणि राजकीय लोकप्रतिनिधींविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुंबईतील प्रभादेवी रोड परिसरात राहणार्या या 140 मराठी कुटुंबांना न्याय कधी मिळणार? आणि या मराठी माणसांना हक्काचे घर कधी मिळणार? हाच मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment