नवी दिल्ली – नीट परीक्षा संगणकीय पद्धतीने ऑनलाइन होणार आहे. कोर्टाकडून सरकारला नीट परीक्षा अधिक कडक करण्याचा आदेश देण्यात आहे. आता देशभरात पेपरफुटीचे टेन्शन कमी होणार आहे. नीट परीक्षेचा पॅटर्न आता बदलणार आहे. सुप्रीम कोटाने मोठा निर्णय घेतला आहे. नीट परिक्षा पेपर फुटीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. कोर्टाने सरकारला नीट परीक्षा अधिक कठोर करण्याचे आदेश दिले आहेत. संगणकीय ऑनलाइन पद्धतीने परिक्षा होणार आहे. पेपर फुटी प्रकरण आता कोर्टात गेले आहे. सुप्रीम कोर्टातून या पेपरफुटी प्रकरणाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे.
आता नीट परीक्षेचे स्वरुप बदलणार असून अधिक कठोर केले जाणार आहे. नीट परिक्षेचे पेपर फोडले जाऊ नयेत यासाठी आता परीक्षेचे स्वरुपच बदलण्यात यावे याबाबत सरकारशी सल्लामसलत करून निर्णय घेण्याच आदेश कोर्टाने दिले आहेत. नीट परीक्षा आता संगणकीय पद्धतीने ऑनलाइन घेण्याबाबत विचार सुरू आहे. यासंदर्भात सरकारशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे कोर्टाने म्हटले आहे. देशभरात पेपर लीक प्रकरणाचा तपास आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणातील अटक करण्यात आलेली आरोपी मनिषा वाघमारे हिच्या जामीन अर्जावर सीबीआय नोटीस पाठवली आहे.
मागच्या 10 दिवसांपासून सीबीआयच्या कोठडीत असलेल्या मनिषा वाघमारेची चौकशी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने आरोपी मनिषा वाघमारे तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. यानंतर तिने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर मंगळवारी ५ जून 2026 रोजी सुनावणी होणार आहे.
सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनिषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी या दोघांनी मिळून एक मोठा कट रचला होता. नीट परीक्षेचा पेपर लीक करणे आणि त्याचे बेकायदेशीरपणे वितरण करणे यामध्ये या दोघांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप सीबीआयने केला आहे. या रॅकेटचे धागेदोरे कुठे पसरले आहेत, याचा शोध घेण्यासाठी सीबीआय अजूनही तपास करत आहे. ५ जून 2026 रोजी सुनावणी होणार आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






