आयटी कंपनीने अचानक गाशा गुंडाळला; ७०० कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गंडा.

SHARE:

पुणे – आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कंपनी अचानक बंद झाल्यामुळे 700 कर्मचाऱ्यांची फसवणुक झाली आहे. हिंजवडीतील थिंक टेक्नॉलॉजी जॉब प्लेसमेंट कंपनी एका रात्रीत बंद करण्यात आली आहे. हिंजवडी येथील आयटी पार्क फेज 2 मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जॉब प्लेसमेंट कंपनीने रातोरात कंपनी बंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या कंपनीने 700 कर्मचाऱ्यांचे वेतन थकवले आहे.अचानक कंपनीला कुलूप लावल्यामुळे 700 कर्मचार्यांची मोठी फसवणुक करण्यात आली आहे. 2025 मध्ये सुरू झालेल्या जॉब प्लेसमेंट कंपनीने नोकरी देण्याच्या बहाण्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून 15,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून वसूल केले होते. सुरुवातीला काही महिने पगार दिल्यानंतर, जानेवारी 2026 पासून कंपनीने कर्मचार्यांचे वेतन दिले नाही.

कर्मचाऱ्यांना दिलेले पगाराचे चेकही बँकेत बाऊन्स झाले आहेत. पगाराबाबत विचारणा करण्यासाठी कर्मचारी गेले असता कंपनीला कुलूप असल्याची घटना उघडकीस आली आहे. या कंपनीचा संचालक फरार झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले आहे. या प्रकरणी फसवणुक झालेल्या कर्मचाऱ्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कंपनीच्या संचालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यात तरूणांना फसवण्यासाठी अशा कंपन्या स्थापन केल्या जातात, तरूणांना नोकरीचे आमिष दाखवतात. अशा स्कॅमर कन्सल्टन्सी कंपनीच्या विरोधात राज्य सरकारने कारवाई करावी, असे हिंजवडीतील आयटी फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी म्हटले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment