महाडिबीटी 2.0 पोर्टलवर मॅट्रीकपूर्व आणि मॅट्रीकोत्तर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु; विद्यार्थी व शाळा-महाविद्यालयांना अर्ज भरण्याचे आवाहन..

SHARE:

अमरावती : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता विमुक्त जाती,इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकपूर्व 9 व मॅट्रीकोत्तर 11 शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडिबीटी 2.0 पोर्टलवर सुरु करण्यात आली असून विद्यार्थी ,पालक व शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी पोर्टलवर अचूक माहिती भरण्याचे आवाहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्ययावत करण्यात आलेल्या महाडिबीटी 2.0 पोर्टलवर सुरु करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने अर्ज भरण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा लागणार आहे. लॉगिन टॅबवर उचित पर्यायांचा वापर करून आधार बेस लॉगिन करता येणार आहे. पात्र योजनेचा तपशील अद्यावत केल्यानंतर विभागनिहाय योजनांची यादी उपलब्ध होणार आहे त्यानुसार योजनेची निवड करून अर्ज करता येणार आहे. पोर्टलवर अर्ज भरताना जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, दिव्यांगत्व, कौटुंबिक उत्पन्न इ. माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.

पोर्टलवर ऑनलाईल नोंदणी व अर्ज करण्यासाठी शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात आल्या आहेत. पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क न घेण्यासह महत्वाच्या महाविद्यालयांचे नाव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमांची नावे, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश शुल्क, रचना इत्यादी माहिती पोर्टलवर मॅप करण्याचे आदेश संबंधित शैक्षणिक यंत्रणाना देण्यात आले आहेत. तसेच अधिक माहिती करिता 022-41150800/18001025311 अथवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करता येईल असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment