१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या बलिदानाचा गौरव करणारे साहित्यिक व कवी प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचे एक काव्यगीत वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
पंधरा ऑगस्ट
पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याचा शुभ दिन आहे.॥
शुरांना अभिवादन आहे.॥
लढले महात्मा गांधी बापू ।
सत्य-अहिंसा तत्व घेऊन ।
सत्य कर्माने, गांधी बापू,
मना मनात शिरले,
बापूंना वंदन आहे ॥
मंगल पांडे, वासु देव बळवंत,
चाफेकरांचा पराक्रम अनंत ॥
देशासाठी हसत हसत
फासावर गेले,
वीरांना अभिवादन आहे ॥
क्रांतीची मशाल पेटवून गेले,
स्वातंत्र्याचे हे दिवस आणले॥
वंदन करू सर्व वीरांना,
शुरांना सलाम आहे,
माझे वंदन आहे ॥
भगतसिंग, राज गुरू, सुखदेव
देशासाठी अर्पिले प्राण,
स्वातंत्र्यासाठी हसत हसत
फासावर गेले,
शुरांना वंदन आहे ॥
देशभक्तीचा काळजावर घाव,
सोबत देश स्वातंत्र्याची नाव ॥
नावेतून या प्रवास करूनी,
गुलामीतून मुक्त केले ॥
शुरांना वंदन आहे ॥
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
समता गौरव पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व कवी, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सामाजिक क्षेत्रातील असंख्य अश्या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






