जेष्ट साहित्यिक, कवी संजय अण्णाजी देशमुख यांची आजच्या नवयुवकांसाठी प्रोत्साहित करणारी कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करत आहोत..
नौजवान…
उठ गड्या तू नौजवान
गाव आपुला सांभाळ रे,
गुपचूप तूच असा राहशील
दोष कुणाला देशील रे,
आपली माती आपली माणसं
भाव मनीचा जागवं रे,
अनितिच्याही मार्गावरुनी
कुणी चालता थांबव रे,
तिमिराच्या, तू वाटेवरती
ज्योत ज्ञानाची पेटवं रे,
कर्तव्याची जाण ठेवुनी
उठ तू जागा होऊन रे,
आंधळ्याची काठी होऊनी
बहिर्याचा तू कान हो रे,
लंगड्याची होऊनी बैसाकी
आवाज मुक्यांचा तू हो रे,
मानवतेचे भान ठेवुनी
नाथ जनांचा तू हो रे,
जाती धर्म भेद विसरूनी
आदर्श गावचा तू हो रे,
सत्यासाठी कुणी लढता
उभे रहावे पाठीस रे,
स्वार्थी लोभी येता आडवे
सावध होऊनी तू लढ रे,
संजय अण्णाजी देशमुख
मु. पळसखेड, जि. अमरावती
संपर्क – ९४२१७८९००९
Author: संजय अण्णाजी देशमुख
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक, मार्गदर्शक, कवी, अभंगकार, पोवाडे रचियेता, सर्वोत्कृष्ट काव्य रचनेचे राज्य स्पर्धा पुरस्कर्ते आहेत. 'चरे अंतरीचे' हा त्यांचा काव्यसंग्रह २०२३ ला प्रकाशित झालेला असून पुढील दोन काव्य संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयावरील ज्वलंत सडेतोड विचार मांडणारेउत्कृष्ट लेखक आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून साहित्य व वैचारिक लेख, काव्यरचना च्या माध्यमातून सतत आपले विचार जनतेपुढे मांडत असतात..






