४ थे बांधिलकी ऑनलाइन कवयित्री संमेलन उत्साहात संपन्न; स्त्रीशक्तीचा रंगला काव्यगजर!

SHARE:

अमरावती : “बांधिलकी प्रतिष्ठान, तसेच बांधिलकी बहुउद्देशिय ट्रस्ट अमरावती” यांच्या वतीने ४ थे जागतिक बांधिलकी ऑनलाइन कवयित्री संमेलन २०२६ नुकतेच अत्यंत उत्साहात संपन्न झाले. ‘आदिशक्तीचा जागर — स्त्रीशक्तीचा काव्यगजर’ या संकल्पनेवर आधारित हे संमेलन रविवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता गुगल मीट (Google Meet) या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पार पडले. जगभरातील व महाराष्ट्रातील विविध भागांतून कवयित्री आणि साहित्यप्रेमींनी या आभासी मंचावर एकत्रित येत स्त्रीशक्तीचा जागर केला.

    या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील नामवंत मा. प्रा. डॉ. ममता इंगोले महल्ले होत्या. संमेलनाचे उद्घाटन टोकियो, जपान येथून मा. उर्मिला देवेन यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्वागताध्यक्ष म्हणून कॅलिफोर्निया, अमेरिका येथून मा. स्मिता भोस्कर चिद्रवार यांनी पद भूषविले. या जागतिक स्तरावरील ऑनलाईन उपक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कल्याण (मुंबई) येथील मा. वर्षा ठकरूल आणि परतवाडा येथील मा. प्राचार्य शारदा गणोरकर लाभल्या होत्या. उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा आणि काव्याच्या ताकदीचा गौरव केला.

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय भक्तीमय वातावरणात मा. सुनिता तायडे यांनी अत्यंत सुमधुर आवाजात स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची नांदी केली. त्यानंतर मा. ॲड. नीता प्रफुल्ल कचवे यांनी आपल्या प्रास्ताविकातून ‘बांधिलकी’ प्रतिष्ठानच्या या उपक्रमामागची भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला. संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि बहारदार सूत्रसंचालन मा. रोशनी कडू यांनी केले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मा. कुमुद कोरडे यांनी मानले.

   या संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे निमंत्रित कवयित्रींचे काव्यवाचन. विविध सामाजिक, कौटुंबिक आणि स्त्री-जीवनावर आधारित दर्जेदार कविता सादर करून कवयित्रींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या संमेलनात खालील निमंत्रित कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या:  शिवांगी वेरूळकर, श्रीमती सुलोचना लडवे, वृषाली वानखडे, शालिनी कावरे, डॉ. राणी चौधरी,स्वाती सेलोकर, पद्मा याऊल, सुचिता टेमधरे, मीना पाटणे, शालिनी बोरखेडे, शारदा बरडे, ज्योती माथने सर्वच कवयित्रींच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे हे ऑनलाइन संमेलन तांत्रिक सीमा ओलांडून रसिकांच्या मनाला भिडले. सर्वांच्या सक्रिय सहकार्यामुळे आणि डिजिटल माध्यमाच्या प्रभावी वापरामुळे हे ‘४ थे बांधिलकी ऑनलाइन कवयित्री संमेलन’ अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरले.

ॲड. नीता प्रफुल कचवे
Author: ॲड. नीता प्रफुल कचवे

लेखिका माजी जिल्हा परिषद शिक्षिका (स्वेच्छा निवृत्त) असून एक उत्कृष्ट साहित्यिक अधिवक्ता, समुपदेशक व वक्ता म्हणून कार्यरत आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान व बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट अमरावती च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. समाजात वाचनालय, बालसंस्कार केंद्र, महिला व युवतींसाठी विविध उपक्रमे, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा, शाळा व कॉलेज मधे विविध विषयांवर व्याख्यान हे त्यांचे प्रमुख कार्य आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी साहित्य मंडळ, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल भारतीय कुर्मी मराठा समाज संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी ३० पुस्तकांचे प्रस्तावना लेखन केलेले आहे. तीन पुस्तकांचे संपादन केलेले आहे. कथा, कविता व लेखन सारख्या विषयांवर कार्यशाळा घेणे, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. त्यांनी स्वतः १० पुस्तकांचे प्रकाशन केले असून ५ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार २०२५, राष्ट्रीय नारिशक्ती पुरस्कार २०२६ दिल्ली, शब्दवेल नारिशक्ती सन्मान २०२६, खरी कारभारीण नारिशक्ती पुरस्कार २०२६, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले काव्यप्रतिभा पुरस्कार २०२६ च्या त्या मानकरी ठरल्या आहेत. समाज जागृती हा त्यांचा आवडीचा छंद राहिला असून, सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा