‘गोकुळ’वर सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीचा झंझावात; महायुतीला जोरदार धक्का, १३ विरुद्ध १२ जागांनी बाजी!

SHARE:

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) झालेल्या निवडणुकीचा निकाल आज रात्री उशिरा जाहीर झाला. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या या लढतीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकत गोकुळच्या सत्तेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर सत्तारूढ महायुती समर्थित आघाडीला १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

 

या निवडणुकीत ९९.९६ टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते. मतमोजणीदरम्यान अनेक फेऱ्यांमध्ये झालेल्या उलथापालथीमुळे आणि शेवटच्या क्षणी झालेल्या अटीतटीमुळे संपूर्ण राज्याचे या निकालाकडे लक्ष लागले होते.

दिग्गजांना मतदारांचा दणका

या निवडणुकीत महायुतीच्या अनेक नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, दूध उत्पादक शेतकरी आणि ठरावधारकांनी अनेक आजी-माजी दिग्गजांना पराभवाचा धक्का दिला आहे. यामध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांच्यासह भाजप नेत्या शौमिका महाडिक यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. मतदारांनी नेत्यांच्या प्रचारातील दबावाला व शपथांच्या राजकारणाला फाट्यावर मारत परिवर्तन घडवून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

गोकुळ दूध संघ निवडणूक २०२६ : विजयी उमेदवारांची पूर्ण यादी

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम अधिकृत आकड्यानुसार विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे आहेत :

१. सर्वसाधारण गट (विजयी उमेदवार) :
  • अभिजीत प्रभाकर तायशेटे (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
  • शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
  • राहुल पांडुरंग पाटील (महायुती)
  • चेतन अरुण नरके (महायुती)
  • अजित शशिकांत नरके (महायुती)
  • किसन बापूसो चौगले (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
  • अंबरीषसिंह संजय घाटगे (महायुती)
  • बाबासाहेब श्रीपती चौगले (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
  • राहुल बजरंग देसाई (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
  • विद्याधर बाबुराव गुरबे (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
  • विरेंद्र संजय मंडलिक (महायुती)
  • मदन बाबुराव देसाई (महायुती)
  • बाबासाहेब विष्णू देवकर (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
  • राजेश नरसिंगराव पाटील (महायुती)
  • रणजितसिंह दिलीपराव पाटील (महायुती)
  • रणजितसिंह कृष्णराव पाटील (महायुती)
  • अजित पांडुरंग पाटील (महायुती)
  • कर्णसिंह गायकवाड (महायुती)
  • विश्वजीत दिनकरराव जाधव (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
  • अमर पाटील कोडोली (महायुती)
२. महिला राखीव गट :
  • अंजना केदारी रेडेकर (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
  • भाग्यश्री धीरज डोंगळे (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
३. इतर मागासवर्गीय (ओबीसी) गट :
  • शशिकांत शामराव खोत (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
४. अनुसूचित जाती (एससी) गट :
  • राजू बाबा आवळे (समविचारी आघाडी – सतेज पाटील)
५. भटक्या-विमुक्त जमाती गट :
  • बयाजी शेळके (समविचारी आघाडी – सतेज पाटील)

थोडक्यात पक्षीय बलाबल :

  • राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी (सतेज पाटील) : १३ जागा
  • महायुती समर्थित आघाडी : १२ जागा

निकाल जाहीर झाल्यानंतर सतेज पाटील यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात जोरदार आतिषबाजी करत व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा