एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : ढोमणे ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील आरोपी अंदमान निकोबारमधून अटक

SHARE:

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘ढोमणे ज्वेलर्स येथे घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य आरोपीला एमआयडीसी व गुन्हे शाखा पोलिसांनी अंदमान निकोबार येथून अटक केली आहे.

घटनेची पार्श्वभूमी : दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ढोमणे ज्वेलर्समध्ये चार अनोळखी इसमांनी शस्त्राचा धाक दाखवून सुमारे ३५० ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने (किंमत ४०,००,००० रुपये) जबरीने लुटले होते आणि मारहाण केली होती.

सक्सेसफुल तपास : पोलिसांनी समांतर तपास, तांत्रिक तपास आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तर प्रदेश व हरियाणातून यापूर्वी चार आरोपींना अटक केली होती. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पाहिजे असलेला आरोपी मुम्तकील मनिर अहमद (वय ३४, रा. अंदमान निकोबार) याचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली.

जप्त मुद्देमाल : आरोपींकडून उत्तर प्रदेशमधील ज्वेलर्सना विक्री केलेले सोने व चांदी, ३ मोबाईल फोन, क्रेटा कार, थार कार, फॉर्च्यूनर गाडी आणि पल्सर मोटारसायकल असा एकूण ५३,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा