कै. मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान तर्फे डॉ. राजा धर्माधिकारी यांचा सत्कार संपन्न; डॉ. राजा धर्माधिकारी एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व – प्रा. अरुण बुंदेले

SHARE:

अमरावती (परतवाडा) – सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी व्यसनमुक्ती सेवक डॉ. राजा धर्माधिकारी यांचा काव्य क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच व्यसनमुक्तीच्या कार्याबद्दल त्यांच्या भार्या सौं. विजया धर्माधिकरीसह कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान, अमरावती तर्फे शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व प्रा. बुंदेले लिखित अभंग तरंग, निखारा, आदर्श अभ्यासाचे तंत्र, दारूनं मेला ओ माय ही पुस्तकं भेट देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहित्यिक प्रा.  अरुण बुंदेले व कवी मा. संजय ठाकरे यांनी व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पांडुरंग भवन देवमाळी, परतवाडा येथे भावपूर्ण सत्कार केला.

       सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “डॉ. राजा धर्माधिकारी एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. हास्य कलाकार नि कवी आहेत. महाराष्ट्रभर साडेतीन हजारांहून अधिक प्रयोग झालेल्या ‘हसरी मैफिल’ नावाच्या दोन तासांच्या स्वतंत्र कार्यक्रमातून हजारो रसिकांना ते आनंदाच्या सागरामध्ये घ‘झी मराठी’ वरील ‘हास्य सम्राट’ कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. व्यसनमुक्ती क्षेत्रातही त्यांनी भरपूर कार्य केले आहे.आज पर्यंत त्यांनी दोन लाख मद्यपींना पूर्णपणे व्यसनमुक्त केले आहे. त्यांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचविलेले आहेत, म्हणूनच त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. परतवाडा रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या ‘जागृती व्यसनमुक्ती केंद्रा’चे संचालक आहेत. ते ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ आणि ‘संस्कार भारती’ यांसारख्या संघटनांमध्ये सक्रिय आहेत. विविध विचारवंतांचा सहवास त्यांनी अनुभवला आहे. त्यांना लिहिण्याची आवड असल्याने ते लोकसत्ता, तरुण भारत, हिंदुस्थान, नवराष्ट्र यासारख्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आणि स्तंभलेखनही करतात. त्यांच्या लेखणीला सामाजिकतेची धार आहे.राजाभाऊंना अभिनयाचीही आवड आहे. त्यांनी ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘काका किशाचा’ ते ‘विच्छा माझी पुरी करा’ यांसारख्या वगनाट्यांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत.राजा धर्माधिकारी हे केवळ एक कलाकार नाहीत, तर व्यसनमुक्तीसारख्या महत्त्वाच्या सामाजिक कार्यात मोठे योगदान देणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे.” असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कवी संजय ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रा. अरुण बुंदेले मातृ-पितृ भक्त व्यक्तिमत्त्व
डॉ. राजा धर्माधिकारी

      सत्कार्याला उत्तर देताना सत्कारमूर्ती डॉ. राजाभाऊ धर्माधिकारी म्हणाले की, “आज खरच सोन्याचा दिवस. मनुष्य यशाच्या शिखराकडे जाताना अतिशय मेहनत घेतो अपरिमित कष्ट उपसून उत्तुंग यश संपादन करीतो. या यशाची दखल घेऊन कौतुकाची थाप जर समाजातील संवेदनशील व्यक्तीकडून मिळाली तर कष्टकऱ्यांचा उत्साह आनंद कितीतरी पटीने वाढतो हे शाश्वत सत्य आहे. अर्थातच दुसऱ्याच्या यशाचे भरभरून कौतुक करायलाही तेवढेच दिलदार निस्वार्थी आणि उत्तुंग वैचारिक पातळी लाभलेले व्यक्तीच असावे लागतात. असे प्रेरणा स्तंभ दुर्लभक्षच असतात. आपल्या विदर्भात मातृपितृभक्त अभंगकार व साहित्यिक प्रा. अरुण बुंदेले अशीच आभाळ उंची लाभलेली उदार व प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. अनेक शाळांना ठराविक रक्कम दान करून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून त्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कै. मैनाबाई बुंदेले स्मृती परितोषिक व कै. बाबारावजी बुंदेले स्मृती पारितोषिक

रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरव करतात असे प्रा. बुंदेले सरांसारखे मातृपितृ भक्त आज सापडणे कठीणच. तसेच समाजात ज्यांनी विशिष्ट क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त केले त्यांचाही ते भावपूर्ण सत्कार व पुरस्कार पूज्य मातोश्री स्व. मैनाबाई  बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे करतात असा हा ध्यास घेतलेला खरा “माणूस” म्हणजे प्रा. अरुण बुंदेले होय. त्यांच्या या कार्याला माझा सलाम !” असे विचार व्यक्त केले.

     कार्यक्रमाचा शेवट ‘डॉ. राजा धर्माधिकारी’ या स्वरचित अभंग गायनाने व ‘निखारा’ या काव्यसंग्रहातील ‘संसाराची धुयधानी’ या व्यसनमुक्तीच्या काव्य गीताने प्रा.अरुण बुंदेले यांनी केला. डॉ. राजा धर्माधिकारी यांचे सत्कारबद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी ऑनलाईन अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहारने झाली.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा