अमरावती : बांधिलकी प्रतिष्ठान, बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट आणि शारदोत्सव सखी मंडळ, नंदनवन कॉलनी, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘झंकार – भूलाबाईची गाणी आणि कविता’ हा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी नंदनवन कॉलनीतील भेंडकर यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
भूलाबाईच्या पारंपरिक गीतांमधून मराठी संस्कृती, लोकपरंपरा आणि स्त्रीमनातील भावविश्वाचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. पारंपरिक लोकगीतांसोबतच कविता आणि आधुनिक अभिव्यक्ती यांच्या संगमाने कार्यक्रमाला वेगळी रंगत प्राप्त झाली. लोकसंस्कृतीचे जतन आणि नव्या पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमात मा. सुनीता तायडे आणि मा. जया ओळंबे यांनी भूलाबाईची गाणी व कविता सादर केल्या. पारंपारिक गाणी व आधुनिक गाण्यांचा मेळ घालत कार्यक्रम रंगला. मा. रोशनी कडू यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. नीता प्रफुल्ल कचवे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश आणि लोकपरंपरेचे महत्त्व विशद केले.
छाया बर्वे तसेच नीता कचवे यांनीही आधुनिक भूलाबाईचे गीत सादर केले. बांधिलकी प्रतिष्ठान व संबंधित संस्थांच्या सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी लोककला, साहित्य आणि परंपरा यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘झंकार’ या कार्यक्रमाने पारंपरिक सांस्कृतिक वारशाला उजाळा देत उपस्थितांच्या मनात आनंदाचे आणि आपुलकीचे सूर उमटविले.
Author: ॲड. नीता प्रफुल कचवे
लेखिका माजी जिल्हा परिषद शिक्षिका (स्वेच्छा निवृत्त) असून एक उत्कृष्ट साहित्यिक अधिवक्ता, समुपदेशक व वक्ता म्हणून कार्यरत आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान व बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट अमरावती च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. समाजात वाचनालय, बालसंस्कार केंद्र, महिला व युवतींसाठी विविध उपक्रमे, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा, शाळा व कॉलेज मधे विविध विषयांवर व्याख्यान हे त्यांचे प्रमुख कार्य आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी साहित्य मंडळ, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल भारतीय कुर्मी मराठा समाज संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी ३० पुस्तकांचे प्रस्तावना लेखन केलेले आहे. तीन पुस्तकांचे संपादन केलेले आहे. कथा, कविता व लेखन सारख्या विषयांवर कार्यशाळा घेणे, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. त्यांनी स्वतः १० पुस्तकांचे प्रकाशन केले असून ५ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार २०२५, राष्ट्रीय नारिशक्ती पुरस्कार २०२६ दिल्ली, शब्दवेल नारिशक्ती सन्मान २०२६, खरी कारभारीण नारिशक्ती पुरस्कार २०२६, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले काव्यप्रतिभा पुरस्कार २०२६ च्या त्या मानकरी ठरल्या आहेत. समाज जागृती हा त्यांचा आवडीचा छंद राहिला असून, सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात.






